महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते | पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
गंगापूर साखर कारखाना १५ कोटी ७५ लाखांचा कथित अपहार | भाजप आ. प्रशांत बंब यांची चौकशी
गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणात गंगापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांची बुधवारी पाेलिसांनी चौकशी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात जवळपास दीड तास झालेल्या चौकशीमध्ये बंब यांच्यावर एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांविषयी विचारपूस करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांमार्फत भाजप सत्ता गाजवू इच्छिते | मग लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल - शिवसेना
राज्यपाल हेच सरकार चालवतील असं नवं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला ? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असं म्हणत आजच्या (२५ मार्च) सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांचे आरोप | निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार - राज्य सरकार
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे मत बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. तसेच या आरोपांत किती तथ्य आहे, याचीही सत्यता आयोगामार्फत तपासली जाणार आहे. ‘कमिशन ऑफ एन्क्वॉयरी ॲक्ट’अंतर्गत ही चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दूध का दूध, पाणी का पाणी करावे | गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्विट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covid 19 Updates | देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील | देशातही रुग्ण वाढ सुरु
महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
आमदार फुटत नव्हते | अनपेक्षितपणे निवडक IPS अधिकाऱ्यांचं बंड समोर आलं | आधीच भविष्यवाण्या?
राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुखच्या मृत्यूचा तपास NIA ला सोपवावा | सेशन कोर्टाचा ATS ला आदेश
अँटिलिया प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात ठाणे सेशन कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) आदेश दिला की, या प्रकरणाचा तपास थांबवून हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला सोपवावा. या प्रकरणात एनआयएने कोर्टाला अपील केले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही एटीएसने त्याकडे तपास हस्तांतरित केला नाही.
4 वर्षांपूर्वी -
आर्किटेक्ट निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग | राष्ट्रवादीचा आरोप
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या खूनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या नागपुरातील धरपेठ येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळात ते स्वत: न्यायाधीश होते | मंत्र्यांवर आरोप होताच ते क्लीन चीट द्यायचे
फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार | हायकोर्टात जाण्याचा सल्ला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | भाजपाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती
अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुंबई पोलिसचे माजी कमिश्नर परिमबीर सिंह यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आणि ट्रान्सफरच्या नावावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान भारतीयाजनात पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आहे. परमबीर सिंह, ट्रान्सफर वाद आणि सचिन वाझेंच्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
...आता फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे - कुणाल कामरा
राज्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय व्यक्तींप्रमाणे सुरु असलेल्या हालचाली आणि कृत्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेच यामागील करविते असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करताना भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध टोकाच्या भूमिका घेतल्याने शिवसेनेत संताप आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस बॉम्ब घेऊन आले | तो भिजलेला लवंगी फटाका निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली. फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. परंतु तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. तसेच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार | पण सेनेविरुद्ध दिल्ली ते गल्ली थयथयाट का? - सविस्तर
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा या अमरावतीतून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्या. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. मात्र निकलानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पलटी मारत भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाहीर पाठिंबा दिला.
4 वर्षांपूर्वी -
ज्या राज्याचे मीठ खातात त्याच राज्याची बदनामी | राजकीय वृत्तीच्या अधिकाऱ्यांवर सेनेचं टोकास्र
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. काल त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आयुक्तांमार्फत पैसे गोळा केलेले | मी त्यांना पुराव्यांसहित माहिती दिलेली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. हातातील सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढळत चालले. देवेंद्र फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
त्या केवळ फोनच टॅप करत नव्हत्या | तर फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अपक्ष आमदारांना फोडण्यातही सक्रिय..
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र ATS'ची कारवाई थेट गुजरातपर्यंत | तपास NIA'कडे जाऊनही तो रोकड भोवतीच..
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा महाराष्ट्र ATS तपास करत आहे. खात्रीलायक माहितीवरून ATS’ने पळत ठेवून नरेश रामणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC