महत्वाच्या बातम्या
-
धक्कादायक | NIA'ने जप्त केलेली मर्सिडीज | भाजप नेत्याचं कनेक्शन आणि गाडीसोबत फोटो
मनसुख हिरेन आणि स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना परिस्थितीचा आढावा | पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक
देशात मंगळवारी 28,869 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.17,746 बरे झाले आणि 187 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 10,935 ची वाढ झाली. नवीन संक्रमितांचा आकडा जवळपास तीन महिने मागे गेला आहे. यापेक्षा जास्त 30,354 केस 12 डिसेंबरला आल्या होत्या. मंगळवारी नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 17,864 रुग्ण केवळ महाराष्ट्रातच आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
CDR चा स्त्रोत आणि CDR स्वतः कडे ठेवून फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत - काँग्रेस
राज्य संकल्पिय अधिवेशनात फडणवीसांनी स्वतःलाच गोत्यात आणलं आहे असंच म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी देखील याची आठवण त्यांना विधिमंडळातच करून दिली होती. मात्र, त्यानंतर देखील ते माझ्यावर कारवाई करा असं तावातावाणे बोलून गेले खरे, मात्र आता राजकीय अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने ते थेट न्यायालयाचा दाखल देत फडणवीसांना सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे प्रकरण | ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकांचा धडाका | दोषींवर कारवाई होणार
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंहच कायम राहणार आहेत. अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीत परमबीर सिंह यांची जागा कायम राहणार असल्याचं ठरलं, असं बोललं जातं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
हवाच काढली? | एका सब इन्स्पेक्टरमुळे राज्य सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही
सचिन वाझेप्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. एका इन्स्पेक्टरचा राज्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असं सांगत शरद पवार यांनी ठाकरे सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाच आज दिला.
4 वर्षांपूर्वी -
गिरीश महाजन पोकळ ठरले | जळगाव भाजपचे ३० नगरसेवक ठाण्यात | शिवसेनेच्या गळाला
शिवसेनेने जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गडाला खिंडार पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ३० नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
NIA ने तपास जरूर करावा | माध्यमांमध्ये बातम्या सोडू नयेत | नाहीतर सर्वांसमोर येऊन बोलावे
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. परंतु, कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील एका मंत्र्याची आज किंवा उद्या विकेट पडणार | चंद्रकांत पाटलांचा दावा
अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मात्र, कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गोध्रा दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट देणारे आणि सध्याचे NIA डीजी वाय. सी. मोदी मुंबईत
कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये मुंबईच्या सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाची देखील एनआयएकडून चौकशी सुरू असून सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझेंवर परमबीर सिंग आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा दावा करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
CDR वरून फडणवीसांची कोंडी | CDR मिळवणे गुन्हा | विरोधकांच्या आवाहनाने अडचणीत
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदारपदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोणालाही वाचवणार नाही | ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार - उपमुख्यमंत्री
मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेरुन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
नितेश राणे आणि युवासेना वाद पेटणार | नाशिकच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
कोर्ट नोटिसची धमकी देऊन दबाव आणताय का | असल्या धमक्यांना मी घाबरत नाही - नितेश राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषद घेत नितेश राणेंवर पलटवार केला होता. तसेच नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असेही वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी | सरावासाठी प्रश्नसंच इथं ऑनलाईन उपलब्ध
दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी , बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सँडविच खाण्यावरून ATS अधिकाऱ्याशी वाद | ATS Vs क्राईम ब्रांच वादात विरोधक आणि NIA'ला इनपुट दिलं?
सध्या समोर येतं असलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल. अटक होण्याच्या अनेक दिवस आधी सचिन वाझे यांनी मला माझे सहकारीच अडकवू इच्छित आहेत असं व्हाट्सअँप स्टेटस ठेवलं होतं. विशेष म्हणजे अधिवेशन काळात विरोधकांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पोलीस खात्यातील दोन भिन्न विभागात पेटलेल्या अघोषित वादात काही माहिती गुप्त पद्धतीने पुरावली गेल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पोलीस खात्यातील काही लोकं फडणवीसांना माहिती देत असल्याचा आरोप करताना राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र हा वाद ATS अधिकारी आणि क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांमधील अहंकारातून पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ITI विद्यार्थ्यांना 28 हजारांपर्यंत शुल्क प्रतिपूर्ती मिळणार | ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खासगी आयटीआयमधून शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंगणा मतदासंघात राष्ट्रवादीकडून लोटसचं ऑपरेशन | महत्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत
भारतीय जनता पक्षात अजूनही गळती थांबेना असं चित्रं आहे. सध्या राज्यात अनेक महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना अनेक मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनास्थिती बिघडत असल्याने कडक निर्बंध
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस काहीसा वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोना रूग्ण आढळून येत आहेत. तर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील तसा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाझे कुटुंबियांकडून हायकोर्टात हेबियस कॉर्पस दाखल | मनसुख यांच्या पत्नीला हाताशी धरून राजकीय नेत्यांनी...
मनसुख हिरेन प्रकरणी क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केल्यानंतर आता API सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या एका अधिकाऱ्यासह एका हवालदाराची सुद्धा NIA कडून चौकशी केली जात आहे. त्यांना तपास संस्थेने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यामध्ये API रियाज काझी यांचीही पुन्हा चौकशी केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागणं झाल्याने अधिवेशनापासून दूर असलेले अनुभवी नेते पुन्हा ऍक्टिव्ह
सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारमध्ये घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे त्याच वेळेस मुंबईचे कायदे व्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोघांच्या आधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबेनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अनिल परब यांनाही भेटले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार