महत्वाच्या बातम्या
-
मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे | राणे कुटुंबाची पार्श्वभूमी गँगपासून खून, अपहरण, खंडणी पर्यंत
आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी IPL सट्टेबाजांकडून सचिन वाझे यांनी १५० कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करताना त्यात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देखील वाटेकरी असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही | पण गृहमंत्री पदी अनिल देशमुख हेच राहतील
वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर राज्याचे गृहमंत्र्यांनाही पदावरुन काढण्याची मागणी होऊ लागली आणि तशा चर्चाही राजकीय वर्तृळात सुरु झाल्या. दरम्यान, या सगळ्या चर्चांना तुर्तास तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुर्णविराम दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेते एका सीरिजने आरोप करत आहेत? | त्या आरोपानंतर रिपब्लिकसाठी संलग्न ट्विट
सध्या सचिन वझे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये काही गोष्टी ताळमेळ ठेवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने होताना दिसत आहेत. १०५ आमदारांपैकी केवळ ठरविक नेते एकमेकांशी संवाद करून ते करत नाहीत ना अशी शंका उपस्थित होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
IPL सट्टेबाजार, खंडणी आणि सचिन वाझे | नितेश राणेंचे वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप
नितेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे तर निमित्त | DIG दर्जा असलेले एक मोठे अधिकारी NIA चौकशीच्या रडारवर?
NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता.
4 वर्षांपूर्वी -
वाझेंच्या चौकशीत NIA'चा फौजफाटा | तर पुलवामा चार्जशीट दाखल करताना केवळ एक व्यक्ती होती
मनसुख हिरेन यांच्या हत्येवरुन सध्या राज्यातील राकारण चांगलंच तापलं आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१५ मार्च) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनानंतर ही पहिली बैठक असणार आहे. महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरणं आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. माहितीनुसार दोन सत्रात ही बैठक पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव महापालिका | शिवसेनेकडून लोटसचं ऑपरेशन होण्याची शक्यता
शनिवारी (६ मार्च) शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या अशोक लाडवंजारी यांच्याशी ‘योगायोगा’ने झालेली भेट आणि चर्चा यांनी महापालिकेच्या राजकारणात वेगळाच योग घडवून आणला असून भारतीय जनता पक्षाचे २४ नगरसेवक १४ मार्चच्या दुपारपासून ‘नाॅट रिचेबल’ झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ED प्रमाणे NIA चौकशीतील माहिती सुद्धा भाजपाकडे प्रथम येते? | भाजपचे ट्विट दावे
अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता महाविकास आघाडी सरकारसाठी ओझे बनले आहेत. वाझेंच्या अटकेने शिवसेना-काँग्रेसला चिंता वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडचणींच्या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत करीत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआयला घुसवले | CBI'ने काय दिवे लावले? - शिवसेना
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. अंबानी स्फोटकं व हिरेन मृत्यू प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले,” असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर हल्ला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यापेक्षा अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांची चौकशी महत्वाची - भाऊ जगताप
मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंना 10 दिवसांची NIA कोठडी | तर फडणवीसांची पत्रकार परिषद
मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल - शरद पवार
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाझेंच्या नेतृत्वातील पथकातील सहकारी पोलीस NIA कार्यालयात दाखल
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी राज्यातील वातावरण चिघळून निघाले होतं.ATS आणि NIA कडून यासंदर्भातला तपास सुरू आहे.काल दिवसभर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॅंट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांचं तोंड काळं झालं' या त्यांच्या वक्तव्यात भविष्यातील कारवाईचे आधीच खात्रीचे संकेत?
मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देश अर्णब के साथ आणि पोलिसांविरोधातील व्याकुळ नेते पुन्हा कार्यरत | नार्को टेस्टच्या मागण्या
मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख प्रकरणाआडून मुंबई पोलिसच रडारवर? | अजून काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता
मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद लॉकडाउन | परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन मिळेना | मदतीला पोलिस दादा धावला
औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आज कॅनॉट, अविष्कार चौक, बळीराम पाटील शाळा, टिव्ही सेंटर अशा विविध भागात बंद पाळण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस यांच्यावर RSS संबंधित ‘या’ संस्थेची नवी जबाबदारी
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार