महत्वाच्या बातम्या
-
मुलीने प्रेमविवाह केला म्हणून जावयावर सुपारी देऊन खुनी हल्ला | भाजपाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा
भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देव माणसं | लग्नाच्या ६ महिन्यात नवऱ्याचा मृत्यू | सासू-सासऱ्यांचा सूनेच्या पुनर्विवाह्यासाठी पुढाकार
आपल्या आजूबाजूला सूनेचा वेगवेगळ्या कारणांसाठी छळ होतानाच्या घटना घडत असतात. पण शालिग्राम आणि वस्तलाबाई वानखेडे यांनी विधवा सूनेचा सांभाळ करत तिचा विवाह लावून दिल्याने त्यांच्या कार्याचे संपुर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालूक्यातील सूनगाव या गावात सूनेच्या लग्नाचा अनोखा सोहळा पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्याचा अर्थसंकल्प | तत्पूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित
विधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल | म्हणून मुद्दाम मास्क घालत नसतील - आठवले
राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क परिधान केलेलं नव्हतं. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी
राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक असलेल्या मराठा आरक्षणावर आजपासून (८ मार्च) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होत आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपवले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील इंधन, वीज दरात सवलत मिळण्याची शक्यता | अर्थमंत्री आज अर्थसंकल्प मांडणार
विधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील.
4 वर्षांपूर्वी -
नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे आणि मात्र तो पूर्वीच्या भूमिकेशी सांगड घालणारा नसला तरी राज्याचा हिताचा असल्याचं म्हटलं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने बासनात गुंडाळलेला नाणार प्रकल्प पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bhulekh Mahabhumi | डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ खाते उतारा ऑनलाईन कसा काढायचा?
एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते. मात्र आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला 8-अ काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला परवडणार नाही - राज ठाकरे
कोरोनोच्या आपत्तीनंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी.’ असे मागणी करणारे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार आखतंय एक धक्कादायक योजना | कारवाँ मासिकाचा दावा | रोहित पवारांचं तरुणांना आवाहन
समाज माध्यमं नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून जी धोरणे राबविली जात आहेत, ती मतदारांचे तीन गटांत विभाजन करणारी आहेत. सरकार समर्थक, सरकार विरोधक आणि काठावरचे असे तीन गट करून सरकारला विरोध करणाऱ्यांसाठी काळा रंग, सरकारच्या समर्थकांसाठी पांढरा रंग तर काठावर असणाऱ्यांसाठी हिरवा रंग अशी विभागणी करण्याची सूचनाही सरकार पातळीवर पुढं आलीय,’ याकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी कारवाँ मासिकाच्या वृत्ताचा दाखल देत देशातील तरुणांना जागृत राहण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तपासाला वेग | ठाणे पोलिसांना मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. मात्र या अहवालात मृत्यू कसा झाला याचा उल्लेख नाही. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. इकडे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा-रेतीबंदर या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध - सर्वेक्षण
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला.
4 वर्षांपूर्वी -
पूजाचा लॅपटॉप आणून द्या | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांच्या या नोटीसीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर अवैध सावकरी | भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षाच्या घरावर सहाय्यक निबंधकांची धाड
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली आहे. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | भाजपचे नाशिक शहराध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले त्याची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | ७ मार्चला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत ८ मार्चला सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाला आपल्या काही भूमिका स्पष्ट करायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये | राऊतांनी विरोधकांना सुनावलं
उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजप काळात रुजू झालेल्या प्रदीप शर्मांसाठी प्रचार | पण सचिन वझेंना लक्ष? - सविस्तर वृत्त
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंब्रातील रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव देखील घेण्याचे प्रकार सुरु आहेत. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ही शंका उपस्थित केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सबसिडी, कर्जमाफी फक्त कॉपोर्टेस आणि मोदी सरकारच्या मित्रांना | बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हा
आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारच्या धोरणाचा भाग नसून तो राष्ट्रीय भावना व जिद्दीचा भाग आहे. स्वयंपूर्ण भारताचा हा मंत्र आता देशातील खेड्यापाड्यात पोहोचत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा
राज्यातील महत्वाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारणाने अचानक वेग धरला आहे. कारण महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी काल (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. केशव घोळवे यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘वैयक्तिक कारणावरुन आपण राजीनामा दिला आहे’ असे सांगितले. त्यामुळे घोळवे यांनी राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे जरी सांगितले असले तरी, नेमके कारण काय याबाबत उत्सुकता कायम आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC