महत्वाच्या बातम्या
-
पूजाचा लॅपटॉप आणून द्या | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांच्या या नोटीसीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर अवैध सावकरी | भाजप युवा मोर्चा शहराध्यक्षाच्या घरावर सहाय्यक निबंधकांची धाड
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली आहे. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | भाजपचे नाशिक शहराध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले त्याची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | ७ मार्चला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत ८ मार्चला सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाला आपल्या काही भूमिका स्पष्ट करायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये | राऊतांनी विरोधकांना सुनावलं
उद्योपगती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा असलेलं वाहन सापडल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने गूढ आणखी वाढलं आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (६ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजप काळात रुजू झालेल्या प्रदीप शर्मांसाठी प्रचार | पण सचिन वझेंना लक्ष? - सविस्तर वृत्त
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंब्रातील रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव देखील घेण्याचे प्रकार सुरु आहेत. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ही शंका उपस्थित केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सबसिडी, कर्जमाफी फक्त कॉपोर्टेस आणि मोदी सरकारच्या मित्रांना | बाकी सर्वांनी आत्मनिर्भर व्हा
आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारच्या धोरणाचा भाग नसून तो राष्ट्रीय भावना व जिद्दीचा भाग आहे. स्वयंपूर्ण भारताचा हा मंत्र आता देशातील खेड्यापाड्यात पोहोचत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा
राज्यातील महत्वाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारणाने अचानक वेग धरला आहे. कारण महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी काल (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. केशव घोळवे यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘वैयक्तिक कारणावरुन आपण राजीनामा दिला आहे’ असे सांगितले. त्यामुळे घोळवे यांनी राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे जरी सांगितले असले तरी, नेमके कारण काय याबाबत उत्सुकता कायम आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाचा मृत्यू झाला त्याच इमारती समोर नगरसेवक घोगरेचं घर कसं? | फडणवीसांना न पडलेले प्रश्न
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा उल्लेख करत फडणवीसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. केश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र याच विषयावरून TRP घोटाळा उघड करणारे मुंबई पोलीस अधिकारी सचिन वझे यांना अडकविण्याचा प्रयत्न होतं नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्या गाडीवरून फडणवीसांना भीषण प्रश्न पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं | संजय राऊतांचं आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
भारतामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत सोबतच लसीकरण सुरू झाले असल्याने आता नागरिकांमध्ये थोडा बेफिकीरपणा वाढला आहे. दरम्यान वांद्रे येथे काल एका पंचतारांकित हॉटेलमध्येही हायजिनशी निगडीत काही नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर FDA ने हॉटेलचे किचन सील केले आहे. सध्या FDA कडून धाडी टाकून कोविड 19 गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत की नाही हे तपासलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवा | राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र सरकार अत्यंत काळजी घेताना दिसत आहे. मराठा आरक्षण प्रकरण हे ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी करत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या 8 मार्च या दिवशी होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने कोर्टात हा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. सध्या हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | राज ठाकरे नाशिकच्या माजी महापौरांना म्हणाले 'मास्क काढ'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिजिटल नातं | पती व्हॉट्सअॅपवर माझा DP ठेवत नाही | पत्नीची पोलिसात तक्रार
तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने जग जवळ आल्याचे बोलले जाते. आता या सुविधेने मूळ गरजांमध्ये स्थान मिळविले आहे. स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे हाच मोबाइल पती-पत्नीमधील वादाचे कारण ठरत असल्याचे आता समोर आले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये भांडणाचे मूळ मोबाइलमध्ये असल्याचे दिसून आले आहे. मोबाइलमुळे पती-पत्नीमधील खासगीपणा नष्ट झाला आहे. बहुतांश संसारांमध्ये वाद होतच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महिलेच्या घरात घुसून भाजप नगरसेवकाकडून महिलेचा विनयभंग | आक्रमक भाजप नेते शांत
मुरबाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Maha TET Exam | टीइटी परीक्षा कायद्यातील दुरुस्तीसाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा
महाराष्ट्रात ज्या शिक्षकांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यानंतर त्यांना ही कायमस्वरुपी लागू राहावी असा राज्य सरकारचा आहे. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच महत्वाची बैठक आयोजित करणार आहेत. त्यासाठी विधानपरिषदेच्या सभापतींसोबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. सभापतींसोबत चर्चा करुण नंतरच हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.
4 वर्षांपूर्वी -
मोठा दिलासा | १ एप्रिलपासून वीजदर २ टक्क्यांनी कमी करण्याचे MERC चे आदेश
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. १ एप्रिल २०२१ पासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आले.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मंजूर
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे राजीनामा पाठवण्यात आला. अखेर राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो | मी फक्त तिला उचलून रिक्षात ठेवलं - धनराज घोगरे
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भाजप नगरसेवकाचे नावही समोर येत आहे. भाजपच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाने गायब करून चित्रा वाघ यांना माहिती पुरवली | बीडमध्ये तक्रार
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचे नाव देखील समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL