महत्वाच्या बातम्या
-
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण | चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची वारंवार मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठी राजभाषा दिन | राज ठाकरे यांचं महाराष्ट्राला विनम्र आवाहन करणारं पत्र
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील पेट्रोल डिझेलवरील सेस ठाकरे सरकार हटवण्याच्या तयारीत?
देशात गेल्या दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. मात्र ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याचे संकेत आहेत. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थखात्याशी संबंधित लोकांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक | आता सोशल व्हायरलद्वारे चित्रा वाघ लक्ष
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या की, आत्महत्येचा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. त्यानंतर त्यांनी सरकारला लाज वाटली पाहिजे असा घणाघात देखील केला होता.
4 वर्षांपूर्वी -
मोदी हे सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू, इंदिराजींपेक्षा महान असल्याचं भक्तांना वाटत असेल तर...
नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी खरपूस टीका आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे कोरोना म्हणता | आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात - फडणवीस
सध्या राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे अधिवेशन होणार का नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे,’ असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 475 पदांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती कंपनीच्या नाशिक येथील एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये करण्यात येणार आहे. ही भरती ४७५ आयटीआय अप्रेंटिसशीप जागांसाठी आहे. यामध्ये फीटर, टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअनपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | 8 लाख विद्यार्थ्यांना मिळणार 21.36 कोटी परत
दुष्काळ आणि नैसर्गिक संकट आदींमुळे राज्यातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची शुल्क माफी करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले, त्यांना त्यांची रक्कम ही परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांची बँक खाती अथवा इतर काही पर्याय आहेत, याचीही माहिती घेऊन ती परत केली जाणार असल्याचे मंडळाकडून कॉप्स या संस्थेचे पदाधिकारी अमर एकाड यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता सातबारा उताऱ्यावर पतीसोबत पत्नीचेही नाव असणार | राज्य सरकारचा निर्णय
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमी करणासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता सात बारा उताऱ्यावर पती आणि पत्नी दोघांचे नाव असणार आहे आणि संपत्तीवर सुद्धा पतीसोबतच पत्नीचंही नाव असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास करत नाहीत | अशा प्रकरणांमध्ये गुन्हा मानूनच तपास करतात
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | भाजपला मदत करत किंगमेकर मनसे महाविकास आघाडीचा मार्ग अवघड करणार?
नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा मनसे साथ देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | सरकार स्वतःच्या आमदारांना घाबरतं म्हणणाऱ्या भाजपवर नगरसेवक लपवण्याची नामुष्की
नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
काय नेता मिळालाय या देशाला | लोकं विसरतील म्हणून मृत्यूपूर्वी स्वतःच्या नावे स्टेडियम
स्टेडिअमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला असून जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मास्क लावण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा - मनसे
आठवडा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा त्यांनी इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वारंवार लॉकडाउनचे इशारे देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीकडून 80 कोटी रुपयांचे वीज बिल
मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने 80 कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ 2 महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल | कोणती कागदपत्रे | जाणून घ्या
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक स्थायी समिती निवडणूक | मनसे किंगमेकरच्या भमिकेत
नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महा मेट्रो नागपूर मध्ये 10 पदांची भरती
एमएमआरसीएल नागपूर भरती 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांनी 10 व्यवस्थापक, खाते सहाय्यकांची अधिसूचना जारी केली आहे. आणि सहाय्यक व्यवस्थापक पोस्ट. पात्र व इच्छुक उमेदवार १६ मार्च २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी एमएमआरसीएल नागपूर भरती २०२० साठी ऑफलाइन अर्ज करु शकतात. एमएमआरसीएल पुणे भरती २०२० साठी वयोमर्यादा, पात्रता आणि ऑफलाइन अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स | पुण्यातील घटना
तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER