महत्वाच्या बातम्या
-
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी
राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृपया कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका | उपमुख्यमंत्र्यांची जनतेला विनंती
कोरोना पाठोपाठ राज्यावर लॉकडाऊनचं संकट गडद होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील ८ दिवसांत रुग्णसंख्या आणि करोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
4 वर्षांपूर्वी -
शिवप्रतिष्ठानमध्ये फुट | संभाजी भिडे गूरूजींच्या निकटवर्तीयाने केली नव्या संघटनेची स्थापना
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू नितीन चौगूले यांची काही दिवसांपुर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वर्षभरापासून त्यांच्या विरोधात तक्रारी येत असल्याने स्वत: भिडे गुरूजींनी कारवाई केली होती. नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्या नव्या संघटनेचे नाव ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थान’ असं आहे. सामाजिक कार्य करून संपुर्ण राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी यावेळी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल | मग बसा बोंबलत - शिवसेना
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत मनसेला शंका | हा सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम - मनसे
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | शरद पवार यांचे 1 मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह | राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल शरद पवार यांच्यासोबत भुजबळांनी लग्नाला हजेरी लावली होती.राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन जाहीर | जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहणार
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल.
4 वर्षांपूर्वी -
लस घेऊनही जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह | तर लस घेतलेल्या पोलीसाचा कोरोनाने मृत्यू
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधणार
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे.अमरावती ,यवतमाळ,अकोला अशा ठिकाणी कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.पुण्यामध्येसुद्धा आजपासून रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी | मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध
राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.पुण्यामध्ये आज कोरोनाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पुण्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यु लावण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलंय - निलेश राणे
शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. 2024 खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलं आहे असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भाजप सोबत होती म्हणून 56 आले असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलणं आवश्यक | कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे
कोविडचा लढा संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असे मोठे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली. या बैठकीत वाढता कोरोना, लॉकडाऊनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
सांगली | महापौरपद निवडणूक | भाजपचे ९ नगरसेवक अद्याप नॉटरिचेबल
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महापौर निवडणूक सध्या वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. येत्या २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून भारतीय जनता पक्षाकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धाकधूक वाढली आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीने महापौरपद खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे एकूण ६ सदस्य गळाला लावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव | BMC ने 1,305 इमारती सील केल्या
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली असून काही नियमही लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्याला गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर शिवसेना नक्कीच मदत करेल
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी आणि शिवसेना | नव्या युतीचे संकेत | कारण ठरतील आगामी पालिका निवडणुका
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण मध्ये 7000 पदांसाठी भरती | शिक्षण १२वी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून खालील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार महावितरण भरती २०२० साठी २० मार्च पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाडिसकॉम भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती खाली वाचा.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही तेल प्रकल्प उभारले | सात वर्षात तुम्ही काय केलं जाहीरपणे सांगा - काँग्रेस
मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP