महत्वाच्या बातम्या
-
यासाठी थोडे दिवस थांबा | कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही हे स्पष्ट होईल - शिवसेना
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद दिसू लागल्याचं सांगितलं जात असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसतं आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहातो आहे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा | अंजली दमानियांची न्यायालयात मागणी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत कोर्टात लेखी मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या | फडणवीसांचं टीकास्त्र
शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासघाडी सरकारवर आज टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
SRA घरं | घरं विकण्याची कालमर्यादा 10 वरून ५ वर्ष | निम्म्याने घट
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही | कॅनडाच्या अक्षयला भारतावर बोलण्याचा अधिकार काय?
सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीकास्त्र डागलंय.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू | हार्टअटॅक ठरलं कारण | काही महिन्यांपूर्वी झाला होता कोरोना
पुण्यात एका क्रिकेट खेळाडूचा लाइव्ह मृत्यू मोबाईलमध्ये कैद झाला आहे. डॉक्टरांनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हार्टअटॅक आला आणि तो मैदानात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसमध्ये
शिवसेनेतील पक्षांतर्गत वादाला कंटाळलेले उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या जाण्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या राष्ट्रीय भरती संस्था स्थापण्याच्या निर्णयानंतर राज्यातही सर्व नोकर भरती MPSC अंतर्गत?
नोकरभरतीसाठीच्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात विविध विभागांच्या सचिवांची बैठक बोलविली आहे. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड ही एमपीएससीमार्फत केली जाते. अराजपत्रित ब, क आणि ड यांची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जाते. ही भरती निवड मंडळांऐवजी एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या संवर्गांची नोकरभरती ही एमपीएससीमार्फत करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते. त्या अनुषंगानेच फेब्रुवारीला मुख्य सचिव बैठक घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे | कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही - आ. मिटकरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने आले होते. त्यावेळी पडळकर यांनी मिटकरींवर जोरदार निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
पुणे पोलिसांची मोठी कारवाई | अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगायोग? पूजाने ३ वर्ष भाजपसाठी काम | तर मृत्यूदिवशी इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवक
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार | नाना पटोले यांची घोषणा
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
यवतमाळमध्ये एका मुलीचा गर्भपात | कागदोपत्री नाव श्रीमती पूजा अरुण राठोड..ती नेमकी कोण?
बीडची टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तूर्तास अभय मिळाल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळपासूनच माध्यमांमध्ये राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारित केले जात होते. परंतु राठोड यांचा राजीनामा घेण्याचा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोणताही विचार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
स्थानिकांना रोजगार द्या | मनसेकडून गाड्या, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड
सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात राज ठाकरे याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली. स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून हा राडा घालण्यात आला .
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे अधिक आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणला इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवकही | अजून चौकशी बाकी
परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाचा राजीनामा
परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्वदेशी अर्जुन रणगाडा | मोदींच्या हस्ते लष्कराला सुपूर्द | त्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था बळकट
देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर कॉंग्रेसला 40 जागाही टिकविता येणार नाही – चंद्रकांत पाटील
देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील | पण....
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याची टिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today