महत्वाच्या बातम्या
-
राम मंदिरासाठी BJP-RSS'ने गोळा केलेला निधी भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भारतीय जनता पक्षाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार | मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
'मनसे खंडणी' असे Google search करा | पहिल्याच पेजवर ह्या बातम्या सापडतील
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी विरप्पन बद्दल बोललो होतो वरुण'ला का झोंबल माहीत नाही - संदीप देशपांडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याच मुद्याला अनुसरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्ष ट्विट करताना म्हटलं आहे कि, “विरप्पनने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब, कंगनासारख्यांना सुप्रीम कोर्टात झटपट न्याय मिळतो | मग....
अर्णव गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, मग लाखो मराठी सीमा बांधवांचा आक्रोश, त्यांनी सांडलेल्या रक्ताची वेदना सर्वोच्च न्यायालयास दिसत नाही का? सीमा वाद कोर्टात असताना कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे विधान भवन निर्माण केले. हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही काय?,’ असा सवाल शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा नियोजन बैठक | नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये शाब्दिक बाचाबाची
शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. कोकणातील राजकारणाचा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सिंधुदुर्गावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने दंड थोपटले जातात. आज या लढाईचा ताजा अंक रंगला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात या बैठकीत जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांच्या पाठीमागे लागलेला सक्तवसुली संचालनालय अर्था ईडीचा (ED) ससेमिरा अजूनही कायम आहे. आता राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अण्णा हजारेंकडून आंदोलनाचा इशारा | भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक - संजय राऊत
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सर्वच स्तरांतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख | अखेर दुरुस्त
रावेर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
सीमावादावर हे शेवटचं हत्यार | आपण अंतिम पर्वाच्या दिशेने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (२७ जानेवारी) ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सीमावादवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी सीमा भागातील संघर्ष आणि त्यांचा अनुभव सांगितला आहे. याशिवाय कर्नाटकात गेलेली मराठी भाषिक गाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी न्यायालयीन लढाई महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा | मुख्यमंत्र्यांची मागणी
मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा कंपनीवर आरोप | त्याच उद्योजकाला पद्मभूषण
दरम्यान, पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण मध्ये 120 पदांची भरती
महाडिसकॉम भरती २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून १२० प्रशिक्षु पदांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले. इच्छुक व पात्र उमेदवार महावितरण भारती २०२१ साठी २५ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल / नोंदणी करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाडिसकॉम भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली वाचा. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
कृषि कायद्यांबाबत रोहित पवारांनी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली | टीकाकारांना उत्तर
केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या पासून सुरु झालेली टीका अनेक नेत्यांनी उचलून धरली आणि त्यासाठी बारामती अग्रोच्या एका बॅनरचा दाखल देत आमदार रोहित पवारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर याच विषयाला नुसरून आमदार रोहित पवार यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? | अजितदादा संतापले
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणाच कारणीभूत - बच्चू कडू
आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाह | तर हमारे दो म्हणजे अंबानी-अदानी - अशोक ढवळे
शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाहीअसा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC