महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा | मुख्यमंत्र्यांची मागणी
मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा कंपनीवर आरोप | त्याच उद्योजकाला पद्मभूषण
दरम्यान, पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण मध्ये 120 पदांची भरती
महाडिसकॉम भरती २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून १२० प्रशिक्षु पदांसाठी अर्ज आमंत्रित केले गेले. इच्छुक व पात्र उमेदवार महावितरण भारती २०२१ साठी २५ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज दाखल / नोंदणी करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाडिसकॉम भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली वाचा. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
कृषि कायद्यांबाबत रोहित पवारांनी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली | टीकाकारांना उत्तर
केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या पासून सुरु झालेली टीका अनेक नेत्यांनी उचलून धरली आणि त्यासाठी बारामती अग्रोच्या एका बॅनरचा दाखल देत आमदार रोहित पवारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर याच विषयाला नुसरून आमदार रोहित पवार यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? | अजितदादा संतापले
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला पंतप्रधान मोदींचा हेकेखोरपणाच कारणीभूत - बच्चू कडू
आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाह | तर हमारे दो म्हणजे अंबानी-अदानी - अशोक ढवळे
शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाहीअसा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे | पण शेतकऱ्यांसाठी नाही - शरद पवार
आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
उद्योगपती अदानी आणि उर्जामंत्र्यांविरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी करा - राज ठाकरे
वाढीव वीजबील प्रकरणात मनसेने नवी भूमिका जाहीर केली आहे. उद्योगपती अडाणी आणि उर्जामंत्र्याविरोधात राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट | आठवलेंच संतापजनक वक्तव्य
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद भोवलं | KDMC मनसेत भूकंप | 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेची चांगली ताकद आहे. तसेच याच महानगर पालिकेत मनसेचं कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क देखील जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांची जनमानसात असलेली चांगली प्रतिमा देखील मनसेसाठी जमेची बाजू समजली जाते.
4 वर्षांपूर्वी -
एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई | भाजपाला मेगा गळती सुरूच | माजी नगरसेवकचा शिवसेनेत प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे यादव नगरमधील माजी नगरसेवक रामआशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत पक्षाच्या ११ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी पक्षविस्ताराच्या तयारीला | प्रदेशाध्यक्षांचा १७ दिवसांचा ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा’
ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस लगेचच पक्षविस्ताराच्या तयारीला लागला आहे. राज्यात लवकरच महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच राज्यात सत्ता असल्याने राष्ट्रवादीने २०२४ च्या अनुषंगाने देखील पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यानिमित्ताने पुढचा कार्यक्रम आखला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोपीनाथ मुंडेंचा व्हिडीओ ट्विट | जातीनिहाय जनगणना करा | पंकजा मुंडेंनी केंद्राला आठवण करून दिली
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमधील मजकुरात परस्पर बदल? | अशोक चव्हाणांमुळे प्रकार उघड
मंत्रालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्परच बदलून फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने राज्य सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण | अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महापोर्टल प्रणाली सरळसेवा भरती | राज्य सरकारकडून चार कंपन्यांची निवड
महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या ‘महापोर्टल’ प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत, महाविकासआघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारनं सरळसेवा भरतीसाठी चार कंपन्यांनची निवड केली आहे.” अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M