महत्वाच्या बातम्या
-
अमेरिकेची एका माथेफिरू, उद्धट माणसाच्या तावडीतून सुटका झाली | थोडा धीर धरा...
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे - राज ठाकरे
शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं | नवं नाव समोर आलं
संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले होते. कोल्हापुरात संभाजी नावाने बिडी बंडल विकले जात होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी काडीलाही हात न लावलेल्या संभाजी महाराजांचे नाव बिडीला देणे ब्रिगेडला नेहमीच खटकत होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार | भाजपचा तिळपापड
नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारीला आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
विजबील थकबाकी | विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता | महावितरण राबवणार मोहीम
लॉकडाऊन काळात किंवा त्याही आधीपासून तुमचे विजबिल थकले असेल तर जवळच्या महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क करा. विजबील भरा अन्यथा तुमचा विजपूरवठा खंडीत होऊ शकतो. महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आदेशानुसार यापुढे मोहीम राबवून थकबाकी वसूल केली जाणार आहे. जे ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केला जाणार आहेत. महावितरणने ही मोहीम अधिक प्रभावी राबवली तर अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | भाजपचे 19 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत | भाजपकडून खंडन
पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात झाली होती. परंतु यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला | EWS ला मराठा संघटनांचा विरोध
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. तर, मराठा ठोक क्रांती मोर्चानं EWS च्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मीरा भाईंदर महापालिका | राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु
मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ हाती बांधले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसने ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. १३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस १९३८, भारतीय जनता पक्ष २९४२,शिवसेना २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
मी तर भरपूर खाज असलेला खासदार आहे | उदयनराजेंची टोलेबाजी
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची वर्णी लागण्याची शक्यता
महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
3113 ग्राम पंचायतींवर भगव फडकला | शिवसेना सर्वात मोठा पक्ष - सविस्तर वृत्त
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील पहिल्याच मोठय़ा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखले असले तरी भाजपशी संबंधित आघाडय़ांना राज्याच्या सर्व भागांमध्ये चांगले यश मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
निधीचं आमिष द्यायला हाती काहीच नसताना मनसेची ग्राम पंचायतीत चांगली कामगिरी
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.
4 वर्षांपूर्वी -
गावात सत्ता नाही, जिल्ह्यात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष | मुश्रीफ यांच्याकडून खिल्ली
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबकडे सिक्रेट लष्करी करीवाईची माहिती कशी | मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची बैठक
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुक | महाविकास आघाडीला ८० टक्के जागा | भाजपाची घसरगुंडी
राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाच एक नंबरचा पक्ष | शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही - देवेन्द्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाला जनतेने कौल दिल्याचा दावा केला आहे. राज्यातील ग्रामपंचायच निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच क्रमांक एकचा पक्ष बनला असून गावागावातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी होतो म्हणून शिवसेनेची कोकणात ताकद होती - नारायण राणे
कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या |आमदार नितेश राणेंची माहिती
कणकवलीत निकाल जाहीर होताच राणेंना धक्का असल्याच्या बातम्या चालू लागल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केलाय. नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, ७० पैकी ५५ ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा | ७ पैकी ४ जागांवर विजय
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL