महत्वाच्या बातम्या
-
गणेश नाईकांना नवी मुंबईचे शिल्पकार नव्हे तर मिस्टर पाचटक्के म्हटले पाहिजे - विजय नाहटा
भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक | गणेश नाईकांविरोधात महाविकास आघाडी एकत्र
भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याला विरोध | स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. परंतु, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाने याकडे लक्ष देत चार सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. परंतु, या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकऱ्यांनी नकाल दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या अहंकारासाठी 'उखाड दिया'ची भाषा | आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे! | सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा
राज्यात सध्या औरंगाबादचं नामंतरण करण्याच्या मुद्दयावर सत्ताधारी पक्षामध्येचं दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने नामांतर करण्याचा विडा उचललाय तर कॉंग्रेस मात्र नामांतरण हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असे म्हणत या नामांतराच्या विरोधात आहे.काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणुकीत यश मिळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या या आमदाराकडून मंत्रिपदाची मागणी
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर (results of 3 graduate and 2 teacher constituencies) सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी | आठवलेंची प्रतिक्रिया
रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या धमाल चारोळ्यांसाठी आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभेत भाषण करताना चारोळीचा उपयोग करून सभागृहाची ते वेळोवेळी दादही घेतात.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | पुढे पुढे पाहा काय होतंय - आदित्य ठाकरे
औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही | विरोधात निवडणुक लढविण्यास तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध लोकसभा निवडणुकीला उभारण्याची तयारी काँग्रेस खासदाराने दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलं आहे. भाजप ही आमची पैदास आहे. 1907 मध्ये यांनी प्रवेश केला आणि 1925 मध्ये जन्म घेतला. ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्यापद्धतीने मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय राहणार नाही, असं बाळू धानोरकर यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं दिसतंय
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरणात राजकारण नको | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
संपूर्ण वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आता अखेर देशवासियांना काहीसा दिलासा मिळणार असून कोरोना लसीची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आजपासून (१६ जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्यव्यापी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) कोविड केअर सेंटरमध्ये या लसीकरणाचा शुभारंभ पार पडला. राज्यात आज पहिल्याच दिवशी तब्बल २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आगामी वसई-विरार महापालिका निवडणूक | पंकज देशमुख शिवसेनेच्या वाटेवर
वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर सध्या स्थानिक पातळीवरील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. वसई विरार पट्ट्यातील महत्वाचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला निवडणुकीआधीच राजकिय धक्का बसला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी जोर लावण्यास सुरुवात केली असून बहुजन विकास आघाडील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित | मोदींनी मीडियासमोर कोरोना लस टोचून घ्यावी
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या प्रमुखांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली होती | पवारांचा भाजपाला टोला
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रोकठोक भूमिका मांडली. जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | मातोश्री महिला सहकारी बँकेत विविध पदांकरिता भरती
MMS Bank Ahmednagar Recruitment 2021 : मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड, पारनेर शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
ब्लॅकमेल-खंडणी | धनंजय मुंडेंच्या मेहुण्याकडूनही रेणूसह तिच्या भावाविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये तक्रार
भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.
4 वर्षांपूर्वी -
ते काही बोलतील त्यावर मी बोलायाचे का? | निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप व ड्रग्ज प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुंडे व मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेणू शर्माला राजकीय फायद्यासाठी भडकवलं जातंय? राजकीय चर्चा सुरु
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News