महत्वाच्या बातम्या
-
आगामी वसई-विरार महापालिका निवडणूक | पंकज देशमुख शिवसेनेच्या वाटेवर
वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर सध्या स्थानिक पातळीवरील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. वसई विरार पट्ट्यातील महत्वाचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला निवडणुकीआधीच राजकिय धक्का बसला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी जोर लावण्यास सुरुवात केली असून बहुजन विकास आघाडील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित | मोदींनी मीडियासमोर कोरोना लस टोचून घ्यावी
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या प्रमुखांनीही निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली होती | पवारांचा भाजपाला टोला
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रोकठोक भूमिका मांडली. जोपर्यंत आरोपांमधील सत्यता समोर येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील, असं शरद पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | मातोश्री महिला सहकारी बँकेत विविध पदांकरिता भरती
MMS Bank Ahmednagar Recruitment 2021 : मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड, पारनेर शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
ब्लॅकमेल-खंडणी | धनंजय मुंडेंच्या मेहुण्याकडूनही रेणूसह तिच्या भावाविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये तक्रार
भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.
4 वर्षांपूर्वी -
ते काही बोलतील त्यावर मी बोलायाचे का? | निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप व ड्रग्ज प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुंडे व मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेणू शर्माला राजकीय फायद्यासाठी भडकवलं जातंय? राजकीय चर्चा सुरु
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED चौकशीनंतर | वर्षा राऊत यांनी कर्जाचे ५५ लाख केले परत पण....
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं आहे.
4 वर्षांपूर्वी -
...मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल - संजय राऊत
आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायचा झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दररोज राजीनामा द्यावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. दिल्लीत सध्या कृषी कायद्यांविरोधात मोठे आंदोलन सुरु आहे. ही गंभीर बाब आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
सत्य समोर येताच रेणू शर्मा यु-टर्न मारण्याच्या तयारीत? | केले ट्विट वर ट्विट
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या निवासस्थानी | कारण आलं समोर...
प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. परंतु, यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया | भाजपचे अपप्रचार तंत्र | काँग्रेसकडून सोशल मीडिया वॉरियर्स टीमची स्थापना
भारतीय जनता पक्षातर्फे समाज माध्यमांवर सुरू असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसनं जोरदार कंबर कसलीय. आता भारतीय जनता पक्षाचा अपप्रचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ हाणून पाडणार आहेत, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत सपकाळ यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
टेस्लाची R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती | नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांची राजकीय फुगडी | आरोप करणाऱ्या महिलेसोबत D. N. नगर पोलीस ठाण्यात
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना आता सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सदर प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब - संजय राऊत
खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
त्या बहिणी एकाच घरात राहतात | तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही? - चित्र वाघ
राज्याचे सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने राज्यात खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करत सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर तसंच खुलाशानंतर काही सवाल उपस्थित होत आहे. “तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?”, असा सवाल उपस्थित करताना आपल्या छोट्या बहीणीसाठी करुणा शर्मा यांनी धावून यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | राज्यात कोणत्या व्यक्तींना कोरोनावरील लस मिळणार नाही?
राज्यात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत कोणाला सर्वात आधी लस मिळणार ती कोणाला देऊ नये आणि कसं असेल नियोजन याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL