महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेतून हकालपट्टी | नंतर शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. परंतु अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे
औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार | मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसंच घोडाझरी शाखा कालवा इथं सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
4 वर्षांपूर्वी -
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो - उपमुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
IAS अधिकाऱ्याला आईवरून शिवीगाळ | तेच आपल्याबाबत घडताच पोलीस अधिकारी लक्ष - सविस्तर वृत्त
तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. मागील ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
MPSC च्या परीक्षा जाहीर | उमेदवारांसाठी सुवर्ण संधी
जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | वसंत गिते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट ED कार्यालयात जमा
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीचा GR रद्द | मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा
राज्यातील पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात 4 जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. आता तो जीआर रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षक-पदवीधर निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार या भविष्यवाणीनंतर अजून एक भविष्यवाणी
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांना समर्थन देण्यासाठी भाजपाने आज कणकवलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती | भाजपकडून जवाबदारीचं वाटप
मुंबई महानगरपालिका निवडणुकी जवळ आली असताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती तात्काळ रद्द करा | अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन छेडू
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्षांभोवतीच्या लोकांवर गितेंना आजही अविश्वास | शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. भाजपमधील एक गट नाराज असल्याने अनेक माजी आमदार तसेच नगरसेवक शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यातच माजी आमदार आणि भाजप नेते वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केले होते. त्यामुळे गिते सुद्धा ‘मिसळी पे चर्चा’ करून भाजपाला राम राम ठोकण्याचा तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सोबत देखील वसंत गीते यांचं राजकीय वैमनस्य असल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ED ला काही नेत्यांचे पुरावे दिलेले | ते भाजपवासी होताच...
राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अडचणीत | औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा | केंद्राला पत्र
एकाबाजूला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – उपमुख्यमंत्री
कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार | ग्राहकांना मोठा फायदा
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्यात आलाय. या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता, पण सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
-
LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
-
Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
-
ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
-
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
-
Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC