महत्वाच्या बातम्या
-
संबंधित तरुणी आणि मेहबूब यांचा वर्षभर संपर्कच नाही | पोलिसांची माहिती | राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या नाहक बदनामीचा प्रयत्न | भाजपवर षडयंत्राचा आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत रणधुमाळी | आ. रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा आमनेसामने
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातही ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिककडून लाच घेणाऱ्या दासगुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पार्थो दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार कधीच पडणार नाही | ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती
ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा | जाणून घ्या तुमच्या प्रवर्गातील मर्यादा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. (MPSC commission now limit for giving competitive examination)
4 वर्षांपूर्वी -
नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा...सरकारची विनंती
कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंची ED चौकशी होणार या भीतीनेच सरळ भाजपमध्ये पळ काढला
नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षात पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर केली. ते सिंधुदुर्गात माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेते विखे पाटलांच्या हॉस्पिटल लॅबमधून कोरोनाचा खोटा अहवाल | गुन्हा दाखल
कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० या काळात घडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न कोकण | अमीर खान नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब सिंधुदुर्गात
कोकणाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सुंदर समुद्र किनारे, नद्या आणि नारळ-फोपळीच्या रांगा हे कोकणाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष देखील सध्या कोकणाकडे आहे आणि त्याची भुरळ आता बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण अमरावतीमध्ये 73 रिक्त पदांची भरती
MahaVitaran Recruitment 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः सादर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिकेत 105 शिक्षक पदावर भरती
Pune Municipal Corporation Recruitment 2020-21 : पुणे महानगरपालिका येथे शिक्षक पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे.
4 वर्षांपूर्वी -
43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही | आरोग्यमंत्र्यांची माहिती
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, लौटा दो हमारे बुरे दिन | महिला महागाईला कंटाळल्या
मागील दोन महिन्यांपासून वारंवार सुरू असलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. दरवाढीच्या निषेधार्थ सांगली येथे महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपचे ३ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, माजी तसेच विद्यमान आमदारांनी भाजपाला रामराम करत महाविकास आघाडीतील पक्षात जाण्याचा सपाटा लावला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | 30 तारखेपर्यंत तोडगा निघतो का त्याची वाट पाहू | अन्यथा
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला 30 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 30 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास विरोधी पक्षाला त्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नववर्षाचे स्वागत घरातूनच करा | या आहेत ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स
कोरोना संकटानं ग्रासलेलं २०२० वर्ष आता शेवटच्या औटघटका मोजत आहे. दोन दिवसांत हे वर्ष निरोप घेईल आणि नव्या वर्षाचा उदय होईल. भीती, निराशा, दुःखाने व्यापून गेलेल्या या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात मुंबई पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुसाट धावेल, या आशेत मुंबईकरही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, याची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ उमेदवारी | अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतं विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
22 आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्य सरकार पाडण्याचा डाव - संजय राऊत
शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today