महत्वाच्या बातम्या
-
एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा | काही राजकीय षडयंत्र नाही ना? | पोलिसांकडून शोध
नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Black Majic against minister Eknath Shinde) यांच्याविरोधात नेमकं कोण राजकीय षडयंत्र रचतंय याचा कसून तपास पोलीस करतायत. शिदेंच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काल उघड झालंय. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत दिसतो. त्यासाठी आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करतायत.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची राऊतांवर तिखट शब्दात टीका म्हणाले....
सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं आहे. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या कृषी कायद्यांत ठाकरे सरकार बदल करणार? | मंत्र्यांमध्ये पत्रव्यवहार सुरु
केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत नोंदवत महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी संबंधित कायद्यांबाबत जी कठोर भूमिका घेतली आहे, त्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचं सरकार नसल्याने असे निर्णय येतात का? | न्यायालय हल्ली कशातही पडत आहे
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणुकीनंतर भाजपाला मोठा धक्का देण्याची महाविकास आघाडीची तयारी
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तर चांगले यश मिळू शकते याचा अंदाज तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आला असून सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याने महापालिका, नगरपालिकांची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे मानले जाते. राज्यातील पाच अत्यंत महत्वाच्या महापालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. जवळपास १०० नगरपालिका/नगरपंचायतींचा एक तर कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे व ती कायम राहील.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सोडून परत या | तिन्ही पक्ष मिळून तुम्हाला पुन्हा निवडून आणू - उपमुख्यमंत्री
मागील चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी काल भारतीय जनता पक्षाला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती | भाजपचे दहापेक्षा जास्त आमदार नाराज - जयंत पाटील
मागील चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी काल भारतीय जनता पक्षाला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे | त्याने आपला जनाधार कळतो
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात 112 पदांची भरती
राष्ट्रीय आरोग्य मिशन भरती २०२०. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्यतर्फे ११२ विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 27 डिसेंबर 2020 रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि एनएचएम भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 16 जागा
एसआरटीएमयू नांदेड भरती २०२०. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून १६ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार आपला अर्ज २४ डिसेंबर २०२० किंवा तत्पूर्वी सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसआरएमयूएन भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वगळलेली १८ गावं केडीएमसीतच राहणार | मुंबई हायकोर्ट | सेनेला निवडणूकपूर्व धक्का
कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivali Municipal Corporation) 27 गावांचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. परंतु, आता मुंबई हायकोर्टाने हा निर्णय रद्द करत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. 27 पैकी वेगळी करण्यात आलेली 18 गावं ही कल्याण डोंबिवली पालिकेतच राहणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणुकीतील पराभव | पक्षातून प्रदेशाध्यक्ष हटाव आवाज येताच नेते स्वतःच्या मतदारसंघात
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
रेकॉर्डवर सांगतोय | मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही - मुख्यमंत्री
मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले. रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते विधानसभेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
लक्ष ठेवा | भाजपकडे गेलेले आमचे कधी राजीनामा देतील | आणि आमच्याकडून निवडून येतील
विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी केंद्र सरकारने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सरकार आणि जनता मिळून कोरोनात चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. नंतर मात्र प्रत्येक राज्याने हा खर्च करावा, असं सांगितलं. संकट मोठं होतं, उत्पन्न कमी झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सुप्रीम कोर्टात टिकला का नाही? - अशोक चव्हाण
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षातले नेते बेजबाबदार वक्तव्यं करत आहेत. या मुद्द्यावर त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही म्हणून उचलली जीभ की लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.” अशी टीका काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. मराठा आंदोलकाना घरात घुसून मारलं जातं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या टीकेला आता अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकीतील अपयश | चंद्रकांत पाटील राजीनामा द्या | भाजपमधूनच विरोध सुरु
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
दोघांविरोधात कोर्टात खटले सुरु | तरी फडणवीसांची अर्णव, कंगनासाठी अधिवेशनात बॅटिंग
रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.
4 वर्षांपूर्वी -
मला पाडून दाखवा | त्या आव्हानावर अजित दादांचं उत्तर | मुनगंटीवार निरुत्तर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान, आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांनी हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद या गुन्ह्यात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार उसळी, मजबूत खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS