महत्वाच्या बातम्या
-
राज्यात २ दिवसाचं अधिवेशन | तर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द | फडणवीस तोंडघशी
राज्य सरकारने बलात्कार, अॅसिड हल्ले आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेला शक्ती कायदा आणला असून या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. परंतु या कायद्याच्या चर्चेसाठी अपुरा वेळ मिळत असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. तसेच, केवळ दोन दिवसाच्या अधिवेशनात भरपूर विधेयकं मांडणं अयोग्य असून चर्चा न करता कामकाज उरकणं हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. मात्र मोदी सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केल्याने राज्यातील भाजप नेते तोंडघशी पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मनसे ग्रामपंचायत निवडणुक लढविणार | सर्व जिल्हाध्यक्षांना ताकद पणाला लावण्याचे आदेश
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shakti Act | महाराष्ट्रातील महिला सुरक्षेसाठीचे शक्ती विधेयक विधिमंडळात सादर
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महिला सुरक्षा हा चिंताच विषय झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारने सर्वप्रथम दिशा कायदा कायदा आणून महत्वाचं पाऊल उचललं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील त्याच दिशने पाऊल टाकत तसाच कायदा राज्यात देखील आणण्यासाठी अभ्यास सुरु केला होता. त्यानिमित्ताने स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करून आढावा घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
धनगर आरक्षण | रासपचं महत्व संपवून भाजपाकडे नैतृत्व घेण्याचा घाट? | पडळकरांना बूस्ट
हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन | नेहरूंनी केला होता गौरव
एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे आणीबाणी, मग थंडीत आंदोलक शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणं काय सद्भावनेची गोष्ट?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला
4 वर्षांपूर्वी -
केकसाठी झुंबड | मन खचून गेलं हे पाहून | ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) होता. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मात्र दुसरीकडे बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आणि त्याची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दानवेंची जीभ कापा | १२ लाखाची गाडी आणि १० लाख रोख मिळवा | सेना पदाधिकाऱ्याची घोषणा
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीला खेड्यापाड्यांत पोहोचवण्यासाठी पवारांनी सांगितला मास्टर प्लान | दिला हा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस (NCP President Sharad Pawar’s 80th Birthday) आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला गावागावात पोहोचविण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचारांची पिढी निर्माण करण्याचं काम आपल्या पक्षानं करायला हवं, असं शरद पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
...तर मोदींच्या खासदारांविरोधात कांदे मारा आंदोलन | शेतकरी संघटनेचा इशारा
शेतकरी आंदोलनावरून सध्या देशभर भारतीय जनता पक्षविरोधात वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासोबतच शेतकरी विषयक इतर मुद्यावरून देखील शेतकरी संघटना भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक होतं असल्याचं पाहायला मिळतंय आणि परिणामी भाजप नेत्यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (Chief MinisterUddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजने;चं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले;.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील | पण नाशिकचा पुढचा महापौर सुद्धा शिवसेनेचाच असेल
संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन हा विश्वास व्यक्त केला. नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने आहे.
4 वर्षांपूर्वी -
यूपीएच नेतृत्व | काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडूनही पवारांना समर्थन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने शरद पवार यांना विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Former Chief Minister Sushilkumar Shinde) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या असून मोठे विधान केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड लागू
राज्य सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे आणि त्यामुळेच आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे याचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलंय. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिलेला असताना आता पुन्हा राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीत पुन्हा राजकीय युद्ध पेटणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजप आमदाराच्या पोश्टरवर खडसे | लवकरच राष्ट्रवादीत?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला होता. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
रोहित, माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो | चला हवा येऊ द्यामध्ये राजकीय टोलेबाजी
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील एकाच मंचावर एकत्र आले आहेत. डॉ. निलेश साबळेंनी त्यांच्या थुकरट वाडीत राजकिय नेत्यांना आमंत्रित केले आहे. लवकरच हा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात याची चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार फसवी योजना | जादा पाण्याचा दावा खोटा | निकृष्ट दर्जाची कामं
फडणवीस सरकारच्या काळात अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारला आहे. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना म्हणावी लागेल आणि विशेष म्हणजे यावर कॅगच्या रिपोर्टमध्ये देखील अनेक नकारात्मक टिपण्या करण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नागपूर महानगरपालिकेत भरती | शिक्षण दहावी पास
नागपूर महानगरपालिका भरती २०२०. नागपूर महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २५ ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक अर्जदार थेट मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत १८ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल. वयोमर्यादा, अर्हता आणि नागपूर महानगरपालिका भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील पोस्ट मध्ये दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | सोलापूर महानगरपालिकेत भरती
सोलापूर महानगरपालिका भरती २०२०. सोलापूर महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १६ सिव्हिल सुपरवायझर आणि पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक अर्जदार थेट मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत १४ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल. वयोमर्यादा, अर्हता आणि सोलापूर महानगरपालिका भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील पोस्ट मध्ये दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL