महत्वाच्या बातम्या
-
दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते | त्या नेत्यांनी त्यांचा काटा काढला
भारतीय जनता पक्षातील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करत आहे. राज्यातील सत्ता हातातून गेल्याने त्यांचा प्रचंड जळफळाट झाला आहे. त्यामुळेच ते असे विकृत चाळे करत आहेत, अशा तिखट शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
धुळे-नंदुरबार | भाजपचे उमेदवार अमरीश भाई पटेल यांचा ३३२ मतांनी विजय
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मोठा फरकाने बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ४ मतं बाद झाली तर ३३२ मतं अमरीश पटेल यांनी मिळवत मोठा विजय मिळवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकार पडले की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील | हे तेव्हा दिसेल - फडणवीस
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार एकदिवस महाआघाडीतील अंतर्गत विरोध आणि वादातूनच कोसळेल. मात्र त्यावेळी भारतीय जनता पक्ष एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या एकूण १०५ आमदार असले तरी त्याचे एकूण १५० आमदार कसे होतात, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल’, असे वक्तव्य राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR पतसंस्था घोटाळा | माजी नगराध्यक्ष चौकशी फेऱ्यात अडकताच महाजनांचं गुपित फोडलं
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वाजपेयीनीं ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे चालवला | तशी ३ पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा पण चालेल
शरद पवार हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिताच येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवत शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार आणण्याचा चमत्कार केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्षांचा ट्रक ५ वर्षे यशस्वीपणे चालवला. मग ३ पक्षांची महाविकास आघाडीची रिक्षा का चालणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असा ठाम विश्वास देखील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ७ जिल्ह्यांतील रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग देखील महाविकास आघाडी सरकारने मोकळा केला आहे. त्यामुळे लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
सरकारकडून कोविड योध्यांना सर्वप्रथम लस | सेनेचे वाघ म्हणतात लोकप्रतिनिधींना अग्रक्रमाने द्या
संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (State health minister Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार (First corona vaccine dose to doctors and Police) असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजना | ठाकरे सरकार सूड बुद्धीने चौकशी करतंय
“जलयुक्त शिवार योजना ही राज्यातील सर्वाधिक प्रभावी लोकप्रिय ठरलेली योजना आहे. परंतु तरी देखील त्या योजनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान देखील करण्यात आलं होतं. केवळ आकस बुद्धीने किंवा सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे,” असा थेट आरोप माजी जलसंधारण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नेते राम शिंदे यांनी (Former minister Ram Shinde on Jalyukta Shivar Scheme) केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू | सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही
राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena Rajysabha MP Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.
4 वर्षांपूर्वी -
कुणी कितीही लॉबिंग करा | पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना लस देणार
संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला - आदित्य ठाकरे
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर एका मुलाखतीदरम्यान प्रतिउत्तर दिलं आहे. “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी उत्तम काम करत असल्याने त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. वास्तविक भारतीय जनता पक्षाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेमुळे ते वैयक्तिक हल्ला करत,” असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (State Environment minister Aaditya Thackeray talked over personal attack from BJP leader) यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? | त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भारतीय जनता पक्षात दिसले असते”, असा दावा त्यांनी केला होता. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
4 वर्षांपूर्वी -
या निवडणुकीच्या निकालांनंतर राज्य सरकार व नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल - गिरीश बापट
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून, मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवण्यात आली असून, इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जागा भाजपच जिंकणार - चंद्रकांत पाटील
राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या सर्वांच्या सर्व जागांवर आम्हीच विजयी होणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सर्व जागांवर जोरदार चुरस आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नव्हे तर पुण्याची जागा तर एकतर्फी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले
4 वर्षांपूर्वी -
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि सर्वत्र धक्कादायक बातमी पसरली. त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातील डॉ. दिगंत आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे,” असं डॉ. दिगंत म्हणाले. डॉ. दिगंत हे प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आणि डॉ.शीतल आमटे यांचे चुलत भाऊ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजपच्या काळातील वकीलच सुप्रीम कोर्टात लढवत आहेत | तरीही जाणीवपूर्वक...
मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातारच्या गादीचे वारसदार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा प्रतिप्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR Scam | खडसेंकडून गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर | बड्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळला
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आहेत. झंवर हे हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ | समाज माध्यमांवर सुप्रिया सुळेंची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण हे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावानं फेक मोबाइल नंबर देखील शेअर करण्यात आला आहे. त्या चुकीच्या माहितीद्वारेच सदर क्लिप शेअर केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ह्या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR Society Scam | सुनील झंवर यांच्या कार्यालयात महाजनांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचं वृत्त
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार बैलासारखं | सतत टोचल्याशिवाय पुढेच जात नाही - गडकरी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. तसं केल्याशिवाय ते पुढेच सरकत नाही, असं टीकास्त्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोडलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी संबोधित करत होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON