महत्वाच्या बातम्या
-
ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात | आता कायदेशीर लढाई लढणार - विनोद पाटील
मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आम्ही संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका आमची नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होणार | दोन दिवसांत अध्यादेश
मराठा आरक्षणामुळं रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कराड येथील प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ते आणि आमदार सोबत राहावेत | म्हणून सरकार पडण्याचं गाजर दाखवावं लागतं - उपमुख्यमंत्री
राज्य सरकार पडणार आहे हे प्रमुख विरोधी पक्षांना वारंवार बोलावच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही एकूण 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला खिंडार | माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला होता आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार असल्याचं माहिती नव्हतं | त्यांचा हा गुण माहिती नव्हता - पवार
दरम्यान शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही | म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर - शरद पवार
ठाण्यातील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik) यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)च्या टीमने छापा टाकला आहे. (raided by officials of enforcement directorate) तसंच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दमछाक होतं कसेबसे नवव्या फेरीत जिंकून आणि लॉटरी लागून झालेले आमदार - मंत्री सतेज पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण, आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी मंत्री सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येईपर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवा | 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला
मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अन्यथा....राज्य सरकारकडून पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेत
कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही | पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो
“देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
4 खासदार असणारे लोकनेते | मग 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वला काय म्हणाल
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. तर ज्या पक्षाचे 4 खासदार आहे त्यांना लोकनेते म्हणताय मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणायचे’ असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फसलेल्या 'मी पुन्हा येईन' टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली | खोचक ट्विट
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. त्यावर स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ बद्दल खुलासा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू | वनमंत्र्यांचा दावा
सत्ताधारी असताना देखील आज राज्य सरकारला त्रास होत आहे. मी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे. परंतु ते सर्व जाहीरपणे सांगता येणार नाही, परंतु उद्धवजी ठाकरेंना देखील प्रचंड त्रास होत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे,’ असा मोठा आणि खळबळजनक दावा महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमचे कार्यकर्ते फडणवीसांना टरबूज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालतं का? - चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?”
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा धोका कायम | राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका - मुख्यमंत्री
दिवाळीनंतर कोरोना (Covid-19)रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या धीराने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवली त्याचं त्यांनी कौतुक केलं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ | फडणवीसांचं टीकास्त्र
महाविकास आघाडीच्या सोलापूरमधील प्रचार सभेत झालेल्या गोंधळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते अमरावती येथे विधान परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला सोडाच कोल्हापूरलासुद्धा चंद्रकांत पाटलांचा उपयोग झाला नाही | मुश्रीफ यांनी सुनावले
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
चंपा'चे ते वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे | उपमुख्यमंत्री संतापले
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
वारकऱ्यांनो सावधान | श्री विठ्ठल महापूजेला विरोध करणारे ते RSS'चे चमचे आहेत - आ. मिटकरी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे आहे. मात्र या पूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचेआमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. “तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ” असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी सैनिक, वीरपत्नी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी थोरातांचा मोठा निर्णय | चंद्रकांत दादांना जमलंच नाही
सध्या लॉकडाउनमुळे प्रत्येकासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. सामान्य माणूस आणि उद्योजक आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्रं असल्याने राज्याच्या महसुलात देखील मोठी घट झाली आहे. परिणामी राज्य सरकारसमोर देखील आर्थिक पेच निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असा निर्णय घेतला आहे जो माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना राज्याची स्थिती भक्कम असताना देखील संपूर्ण कार्यकलात जमला नव्हता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today