महत्वाच्या बातम्या
-
अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली - निलेश राणे
प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केलं होतं. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील आणि राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कालच्या घटनेचा संबंध भारतीय जनता पक्षाने थेट आणीबाणीशी जोडला तर, आता दुसरीकडे भारतीय जाताना पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांभोवतीच वेगळा संशय व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाही | पण भाजपाची तळी उचलणाऱ्या संपादकांचं दुख दिसतं
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार | राज्य सरकारचा निर्णय
अनलॉक ५ ची सुरुवात होऊन अनेक गोष्टी हळूहळू सामान्य लोकांसाठी खुली होतं आहेत. लॉकडाऊन मधून राज्य पूर्णपणे बाहेर येण्याच्या जवळ येऊन ठेपलं आहे. मागील काही दिवसात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह उद्यापासून खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या म्हणजे गुरुवारपासून राज्यातील सिनेमागृह तसेच नाट्यगृह सुरू करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं
राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत | राष्ट्रवादीचा पक्षविस्तार
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगमध्ये अनेक भाजप पदाधिकारी राष्ट्र्वादीत प्रवेश करत असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्र्वादीने पक्ष विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल | खडसेंची गर्जना
दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे
महाराष्ट्र आज संपूर्ण दिवसभरात एकूण १०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ४,००९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा तसेच कोरोना मृतांचा आकडा जलदगतीने खाली येताना दिसत आहे जे सकारात्मक म्हणावं लागेल. मागील तब्बल ७ महिन्यांपासून कोरोनानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं, पण आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे असं आकडेवारी सांगते.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्य मंत्री म्हणतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी | टाटा इन्स्टिट्युट म्हणतं लाट येणार
गेल्या महिन्यात अगदी शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा उचल घेत असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी मृत्यू दर मात्रं कमी होताना दिसत आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं म्हटलं गेलं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना खा. विनायक राऊत मास्क काढून बैठकीतच शिंकले | बेजवाबदार लोकप्रतिनिधी
राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी झाला असला तरी कोरोनाचा एकूण परिणाम सुरूच आहे आणि रोज नवनवी आकडेवारी समोर येतं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारंवार सामान्य लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनावर अजून लस आली नसल्याने मास्क आणि इतर उपाय योजनाच सध्या कोरोनावर उपाय असल्याचा सरकार वारंवार सांगत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या संकटमोचकांना धक्का | खडसेंचा भाजपावर पहिला राजकीय सर्जिकल स्ट्राईक
दोन दिवसांपूर्वी भाजपने मुक्ताईनगर मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले होते. त्यात गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाने मागील काही दिवसात घेतलेले पक्ष मेळावे वाया गेल्याच चित्र आहे, कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला नव्हे तर राष्ट्रवादीला महत्व देत एकनाथ खडसे यांचावर विश्वास दाखवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजा व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषद | राज्यापालांकडे संविधानिक अधिकार | त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल
विधान परिषदेच्या १२ जागांचा प्रश्न पुन्हा वादाच्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील प्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या वक्तव्यातून त्याचे संकेत मिळू लागले आहेत. याबाबत प्रसार माध्यमांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावर व्यक्त होताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार असतात आणि त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल’. पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यातून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | यादी बाजूला करण्याचं त्यांचं आधीच ठरलंय | मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट
विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार महाविकास आघाडी सरकार उचलणार
मराठा आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात रखडल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठे शैक्षणिक पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधातील पेच देखील वाढतांना दिसला आणि महाविकास आघाडी सरकार सुद्धा दबावाखाली असल्याचं पाहायला मिळालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास आग
आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue)उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
4 वर्षांपूर्वी -
रामराजे-उदयनराजेंची खास भेट | साताऱ्यातील दोन राजेंचा राजकीय वाद मिटला
जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांशी राजकीय वितुष्ट असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत दिलखुलास गप्पा मारल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्बेतीची चौकशी करत काळजी घेण्याचा सल्लाही एकमेकांना दिला. हा दुर्मिळ योग साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी साडेसहा वाजता जुळून आला. रामराजे- उदयनराजे यांच्या भेटीची जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात लोकनियुक्त सरकार | राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही | राऊतांचा भाजपाला टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC