महत्वाच्या बातम्या
-
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय न घेण्याचे आदेश
Maharashtra Political Crisis | मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी करण्यास मंजुरी दिली. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. तर, दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील आमदारांची अपात्रता आणि इतर मुद्यांवर सु्नावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने याचिकेवर सुनावणी करताना निवडणूक आयोगास सुनावणी घेण्यास मुभा देण्यात आली. या सुनावणीत शिंदे गट आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी बाजू मांडताना निवडणूक आयोग घटनात्मकदृष्ट्या स्वतंत्र संस्था असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता.
2 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरूच राहणार, घटनापीठाच्या नक्की मनात तरी काय?, अनेक अंदाज व्यक्त
Shivsena Crisis in Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज शिवसेनेच्या चिन्हाबद्दलच्या याचिकांवरील सुनावणी झाली. आधीच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल येईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज न्यायालयाने प्रक्रिया पुढे नेण्यास संमती दिली.
2 वर्षांपूर्वी -
मुख्य निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हांबाबतची प्रक्रिया सुरु करण्याला परवानगी, सुप्रीम कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही
Shivsena Crisis in Supreme Court | सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली असून शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्दव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती, ती मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाला ठाण्यात धक्का, दोन माजी नगरसेवक शिवसेनेत पुन्हा परतले, शिंदेंच्या कार्यशैलीवर नाराज
Shivsena | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता हळूहळू माजी नगरसेवक परतत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमध्ये दाखल झालेले ठाण्यातील दोन माजी नगरसेवक- अंकिता पाटील आणि नरेश मणेरा नुकतेच परतले आहेत. बंडाळीनंतर ठाकरे यांच्या गटाला मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथून प्रथमच पाठिंबा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
पवारांची साथ सोडणाऱ्या पिचड पिता-पुत्राचा आमदारकी, ग्रामपंचायत पासून आता साखर कारखाना निवडणुकीतही पराभव
Madhukar Pichad | अकोलेतील अगस्ती सहकारी साखर कारखाना २१ संचालक निवडीसाठी काल रविवारी मतदान होत आहे. ९ मतदान केंद्रांवर २३ बुथवर २२५ कर्मचारी मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती आहे. माजी मंत्री मधुकर पिचड विरोधात महाविकास आघाडी एकत्र आल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती.
2 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयातही राणेंना धक्का, नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 3 महिन्यात पाडण्याचे आदेश
Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने राणेंची आव्हान याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच संबंधित अवैध बांधकाम पुढच्या तीन महिन्यांमध्ये पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. देशाचे माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी राणे यांची बाजू मांडली होती.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, शिंदे समर्थकांमुळे मराठा समाजातील नेते संतापले
Minister Tanaji Sawant | 2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले. त्यानंतर मराठा समाजात शिंदे गटाविरोधात संतापाचे वातावरण आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील मंत्र्यांकडून मराठा समाजाचा अपमान | २ वर्ष गप्प राहिलात, आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली?, असं वादग्रस्त वक्तव्य
Minister Tanaji Sawant | 2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
वेदांता प्रकल्पाची कोणती चिठ्ठी मुख्यमंत्री शिंदेंनी विधासभेत वाचलेली हा संशोधनाचा विषय, आता फडणवीस आणि कदमांच्या अजब मागण्या
MLA Santosh Bangar | देशात सामान्य लोंकांसाठी महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे झाले आहेत. दुसरीकडे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच वेंदांता सारखा १ लाख लोकांना रोजगार देऊ शकेल असा प्रकल्प तडकाफडकी गुजरातला गेल्याने तरुणांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे सर्मथक आ. संतोष बांगर यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा फिल्डिंग लावून हल्ला, बांगर सुसाट पळाले
MLA Santosh Bangar | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर आले होते. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची गाडी अडवली.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवले म्हणून महिला शिवसैनिकावर लगेच देशद्रोहाचा गुन्हा | पण PFI आंदोलकांवर इतका उशीर का?
PFI Protest Pakistan Zindabad Slogans | पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवासेना (शिवसेना), मनसे आणि भाजपने या आरोपींवर देशद्रोहाची कलमं लावण्याची मागणी केली होती. काल पुणे तळेगाव येथील मोर्चात देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना यावर लगेच कारवाई होणं अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे युवासेना देखील पुण्यात आंदोलनात उतरली होती आणि पोलिसांवर सर्वच बाजूने राजकीय दबाव वाढला होता. मात्र एवढं घडूनही शिंदे सरकारने इतका उशीर का केला याची चर्चा रंगली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
CM Eknath Shinde | राज्यात शिंदे सरकार आल्यापासून एकावर एक धक्कादायक घटना घडत आहेत. एकाबाजूला रोजगारावरून तरुणांमध्ये असंतोष वाढत असताना दुसरीकडे राज्यात पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने धाडी टाकल्या. या प्रकरणात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली असून, या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळचे काही व्हिडीओ समोर आले असून, या व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. दरम्यान, या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. ‘शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत
Shivsena | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार संबोधताच उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे पुत्राच्या बचावासाठी शिंदे गटातील नेत्यांकडून 'स्क्रिप्टेड खोटा प्रचार' सुरु | सुप्रिया सुळेंचा फोटो एडिट करून बदनामीचा केविलवाणी प्रयत्न
MP Supriya Sule | खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत असा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता आणि श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विटही केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला.
2 वर्षांपूर्वी -
मुस्लिम समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या अभ्यासासाठी शिंदे सरकारकडून निधी मंजूर, तर लालबागचा राजा मंडळाला दंड
Shinde Fadnavis Govt | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला (टीआयएसएस) संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक विकासाचा अभ्यास करण्यास राज्य अल्पसंख्याक विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ३३ लाख ९२ हजार रुपये मंजूर केले आहेत. टाटा सामाजिक संशोधन परिषद, मुंबई यांनी राज्यातील 6 प्रादेशिक महसूल आयुक्तांमध्ये 56 कामगारांची नावे दिली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई MMRDA मैदानाची क्षमता 1 लाख | भावना गवळी म्हणाल्या राज्यभरातून 10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार - ग्राउंड फॅक्ट रिपोर्ट
MMRDA Ground Capacity | शिवाजी पार्कवर यावर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही गटांना मैदान न देण्याचा निर्णय रद्द करुन उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिकाही फेटाळून लावण्यात आली. दरम्यान आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे, असे म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाचा शिंदे गटाला झटका, बीएमसीला फटकारत ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी
Shiv Sena Dasara Melava 2022 | शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार शिंदे पिता-पुत्राची प्रॉपर्टी?, मुख्यमंत्री दौऱ्यावर असले की खासदार पुत्र श्रीकांत शिंदे सुपर सीएम असतात?
MP Shrikant Shinde | राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेला एक फोटो चर्चेत आहे. या फोटोनंतर राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदेंचं सुपर सीएम झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | उद्धव ठाकरे खोटं बोलतात?, होय!, फक्त नारायण राणे '100 टक्के खरं' बोलतात, व्हिडिओ पहा.. तुमचाही विश्वास बसेल
Union Minister Narayan Rane | उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांसमोर केलेल्या भाषणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्ला केला. नरेंद्र मोदींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. भाजप नेते, शिंदे गटातील सहकाऱ्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं, तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | शिंदे पत्रकारांना त्यागाबद्दल सांगत होते, आ. भुमरे हसत समोरच्याला इशारा करून, 'साहेब बघ कसे दणादण फेक....???
Viral Video | मुख्यमंत्री व्हायला मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला दूर केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर गद्दार कोण आणि खुद्दार कोण? हे महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोके सरकार म्हणून हिणवलं जातं आहे. पण लक्षात ठेवा माझ्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे असाही इशारा एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीतून दिला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार