महत्वाच्या बातम्या
-
ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या | पण सरकार पूर्ण ताकतीने चालेल
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही | अशोक चव्हाण
महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बाबतीत आलबेल नसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही | गिरीश महाजन
भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या बैठकीत व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने राज्यात काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते | म्हणून काँग्रेसने...
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भिवंडी निजामापुर शहर महानगरपालिकेत 09 जागा | १२वी पास
भिवंडी निजामापुरा शहर महानगरपालिका भरती 2020. बीएनसी महानगर पालिका भारती २०२०: भिवंडी निजामापुरा शहर महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून त्यामध्ये समुदाय संघटक पदासाठी (Community Organizer Posts) अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार बीएनसी महानगरपालिका भारती २०२० वर १३ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा आधी ऑफलाइन अर्ज करु शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आईसोबत बसलेल्या ३ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेलं | आईने...
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंविरोधात बार्शी पोलिसांत तक्रार दाखल | मुख्यमंत्र्यांवर टीका भोवली
भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना ‘गांडूळ, पुळचट’ यासारखे शब्द वापरले होते, त्यामुळे त्यांच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंकडून फडणवीसांना उत्तर
केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. तसंच यासंदर्भात याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोपीनाथ मुंडेंच्या काळातला दबदबा उरला नाही | पंकजांच्या नैतृत्वावर भाजपमधून प्रश्नचिन्ह
मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज राजकारणी आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेल्या पंकजा मुडेंवर गोपीनाथ मुंडेंचं नाव आणि दबदबा पुढे करून पक्षांतर्गत राजकीय हल्ले सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांच्या आडून सध्या सुरु झालेले राजकीय हल्ले भविष्यात इतर विषयात देखील तोंडवर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांकडून पंकजा मुंडेचं कौतुक | पवारांच्या गुगलीने भाजपाची डोकेदुखी वाढली
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक (Sharad Pawar praised Pankaja Munde) केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आहे | पवारांकडून फिरकी
राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपली.
4 वर्षांपूर्वी -
जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का | पवारांचा केंद्राला सवाल
धाडी, आयात, निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. मात्र, जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला खडसावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | जान कुमार सानूचा मराठी भाषेबद्दलचा द्वेष दाखवणारा व्हिडिओ पाहा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाबाबत खंबीर | राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - उदयनराजे
काल (२७ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात राज्यातील महत्वाचा प्रश्न असलेल्या मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सरकारवर टीका करत इशारा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे इशारा देत खासदार उदयनराजेंनी म्हटलं आहे की, आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? - सविस्तर
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश | खासदार सुनेची भाजपच्या बैठकीलाच दांडी
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) जळगावात पोहचले आणि त्यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं होतं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात शिवसेना विरोधी पक्षात बसेल - आ. रवी राणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली होती. त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित, कंगना रानौत आणि राणे कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता. तर हिम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
काल पंकजा मुंडेंशी मतभेद | आज भाजपा आ. सुरेश धस यांना पवारांसोबतच्या बैठकीत प्रवेश
२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी काल आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र होतं. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं काल पाहायला मिळत होतं.
4 वर्षांपूर्वी -
घटनापीठापुढेच आम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे - अशोक चव्हाण
सर्वोच्च न्यायालयात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपिवले होते. मात्र उद्याची सुनावणी न्या. नागेश्वर राव यांच्याच खंडपीठापुढे होणार असल्याने उद्या काय होणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून होती.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरी सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली
मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्याचवेळी राज्य सरकार चांगली बाजू मांडेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC