महत्वाच्या बातम्या
-
राणे आणि त्यांची मुलं कुणाचीही लायकी काढणं आणि खाली पाडून बोलण्यात धन्यता मानतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित | आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे (Corona Test) दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. ४५०० रुपयांवरुन ९८० रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज (२६ ऑक्टोबर) सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही | आठवलेंचं वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित, कंगना रानौत आणि राणे कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला. तर हिम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
खासदार, आमदारांच्या २ वर्षांच्या निधीवरून उदयनराजेंचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे (BJP MP Udayanraje Bhonsale) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी (MP and MLA Two Years Fund) तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते कुठे गेले? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलेच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नागपूर औष्णिक विद्युत केंद्रात १२५ जागांसाठी भरती
MAHAGENCO Recruitment 2020 Apply online for 125 Apprentice Vacancies in Nagpur – Maharashtra location. Maharashtra State Power Generation Company Limited Officials are recently published a job notification to fill up 125 Posts through Online mode. Candidates who are searching for latest Govt jobs in Maharashtra 2020 can use this opportunity. MAHAGENCO Recruitment necessary qualification, Age limit, Pay scale and how to apply details are given below. MAHAGENCO career official website is www.mahagenco.in recruitment 2020. All the eligible aspirants please read the MAHAGENCO 2020 official notification (Given below) carefully before applying for Apprentice job. Last Date to Apply Online is 1st November 2020. MahaGenco Bharti 2020.
4 वर्षांपूर्वी -
ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे | लक्षात घ्या - प्रकाश आंबेडकर
बीडमध्ये एकाबाजूला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस समोरासमोर आले आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना १५० टक्के, १०० टक्के, ७० टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला २१ रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस आमनेसामने
२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोहिणी खडसेंना तिकीट देणं ही भाजपची खेळी | खडसेंचा दावा
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने माझं तिकिट कापलं.. मी रोहिणीताईंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक त्यांना तिकिट दिलं गेलं. त्यानंतर त्यांना पाडण्यासाठी भाजपातल्याच काही गद्दारांनी काम केलं असाही आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षांतर करा असं मला माझे कार्यकर्ते कायमच सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे तो तुम्ही सहन करु नका असं मला कार्यकर्ते सांगत होते. मात्र मी चाळीस वर्षे पक्षात होतो त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे | आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील - संजय राऊत
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं असेल - संजय राऊत
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्व आहे. कारण यावर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीत इनकमिंग | काँग्रेस नेते काका कुडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Kaka Kudalkar join NCP) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यलाय उघडण्यासाठीही भाजपचा कार्यकर्ता उरला नाही
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर मध्ये भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. अशात मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयाला लागलेल्या कुलुपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी असायची. आज मात्र हे कार्यालय सुने सुने दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे जनतेनेच ठरवावे | सुजय विखेंच वक्तव्य
नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.२४ आॅक्टोबर) टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. नगर जिल्ह्यातील नगर-जामखेड रोड, बाह््यवळण रस्ता, के. के. रेंज, उढ्ढाण पूल व प्रत्येक मोठी विकास कामे ही संरक्षण खात्याशी निगडीत आहेत. या कामांसाठी मलाही वारंवार दिल्लीला जावे लागते. यामुळे आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. तरच जिल्ह्यातील रखलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामांना गती येईल, असेही डॉ. विखे यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अँपवर बंदी आणा - चित्रा वाघ
मागील काही दिवसांत सोशल मीडियात नवी अँप कार्यरत झाली आहेत. ही अँप मुलींचे आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावरुन संकलित करतात आणि त्या फोटोंना मॉर्फ करुन अश्लील पद्धतीने वापरले जाते. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि असे प्रकार करणाऱ्या अँपवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून अँप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
मतदान मागण्याच्या वेळीही मला फ्लेक्सवर जाहिरात करण्याची गरज पडणार नाही - आ. रोहित पवार
महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या राजकारणामुळे अजून एक भाजप समर्थक आमदार शिवसेनेत
भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजप उ. महाराष्ट्रात अनाथ होणार | बच्चू कडूंची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
त्यांनी १ वर्ष फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे विकली - राम शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mega Bharti | महापारेषणमध्ये लवकरच 8,500 जागांची मेगाभरती
पोलीस भरती नंतर आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून राज्य सरकारची आर्थिक कोंडी | निसर्ग चक्रीवादळ व मास्कचे पैसेही अडवून
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC