महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा | आ. मिटकरींचा टोला
“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नेमके काय बोलणार ? कोणती मोठी महत्त्वाची घोषणा करणार ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या याच संबोधनानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या रिट्विटमध्ये थेट मोदींवर निशाणा | भाजपाच्या राजकीय गळतीचे संकेत
भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण जयंत पाटील यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासोबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुण्यात मित्राकडूनच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने क्रूर हत्या
मागील भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची अंगाची थरकाप उडवणारी घटना पुण्यातील औंधमध्ये घडली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते - बच्चू कडू
जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असे आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी या वयात फिरतोय | तु किमान घराबाहेर पड | असंच पवारांना म्हणायंचं असेल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. या आधी मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नव्हते म्हणून विरोधी पक्ष टीका करत होते. तर आता बाहेर पडल्यावरही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला ते आधी फडणवीसांनी स्पष्ट करावं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थिल्लरपणा करु नये असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असं म्हटलं आहे यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचं नुकसान होईल असं नाथाभाऊ वागणार नाहीत | चंद्रकांत पाटील आशावादी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे असे बोलले जात आहे. २२ ऑक्टोबरला ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाही, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मनधरणी सुरु आहे,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर पूर | २ दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य | फडणवीस सरकारचा तो GR
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. सागंली आणि कोल्हापूरला या पुराचा सर्वात अधिक फटका बसलेला आहे. अशातच अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय काढला आहे. मात्र या शासन निर्णयाचे निकष पुरग्रस्तांची थट्टा करणारे आहेत. हा शासन निर्णय समोर आल्यानंतर आता त्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत | फडणवीसांचा खरमरीत टोला
सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपाला दोन राजकीय धक्के देणार | पहिला एकनाथ खडसे | आणि दुसरा...
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. इतकचं नाही तर खडसेंनी २ दिवसांपूर्वी भाजपाच्या अधिकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येऊ लागल्या आहेत, खुद्द एकनाथ खडसेंनी यावर मौन बाळगलं असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होते.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात फडणवीसांची 'लाव रे तो व्हिडीओ' रणनीती
राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखणेवर मीठ चोळण्याचं काम करु नये,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
हवेतले नेते सत्ता गेल्यावर जमिनीवर | जमिनीवरील नेते नेहमी जमिनीवरच
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्या. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घ्यावी लागली.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेचं वर्चस्व असलेल्या बँकेच्या चेअरमनला लाच घेताना अटक
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील 2 वर्षापासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.
4 वर्षांपूर्वी -
आज कुठे २-३ तासांसाठी बाहेर आलात | लगेच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत | फडणवीस संतापले
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पावसामुळं रस्ता खचला | चिखलातून वाट काढत फडणवीस गावकऱ्यांच्या भेटीला
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या मदतीत काय चूक | पंतप्रधानांचा मला फोन आला होता | मदत करू म्हणाले होते
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडले आणि बांधावर गेल्याने...काय म्हणाले आशिष शेलार?
राज्यात आजी आणि माजी मुख्यमंत्री परतीचा पाऊस आणि पुरामुळे काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करत आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी “देर आए, दुरुस्त आए”, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा | शेतकऱ्यांना २५ हजारांचे मदतीचे धनादेश
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून पाहणी दौरा सुरू होत असून बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या, पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी मंत्र्यांच्या आणि खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.
4 वर्षांपूर्वी -
टोलवाटोलवी न करता आधी राज्य सरकारने मदतीची घोषणा करावी - फडणवीस
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today