महत्वाच्या बातम्या
-
भाजप नेते शिंदेंना ऑपरेट करतात? | फडणवीस झाले, आता गिरीश महाजनांचा व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा दावा खरा ठरतोय
CM Eknath Shinde | काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे भाजपाच्या खासदाराचं नाव घेण्यास विसरल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी हळूच खिशातून पेन काढला आणि टेबलवर असलेल्या एका कागदावर खासदार धनंजय महाडिक यांचं नाव लिहिलं. कागद हळूच मुख्यमंत्र्यांपुढे केला आणि मुख्यमंत्र्यांनीही लागलीच कागदावरील नाव वाचून धनंजय महाडिकांचंही नाव घेतलं होतं आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे शिंदे हे पूर्णपणे भाजपच्या स्क्रिप्टवर चालतात असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र आता अजून एक प्रकरण समोर आलं जातं आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना काय सांगून विषय टाळावा हे भाजपचे गिरीश महाजन सांगताना दिसत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्व हिंदू तसेच मराठी माणूस आणि स्वतः चंद्रकांत पाटील सुद्धा शिवसेनेमुळे वाचले, पहा व्हिडिओ
Minister Chandrakant Patil | मुंबईतल्या नेस्को मैदानावर काल शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात भाषण करत तुफान टीका केली. एवढंच नाही तर ठाकरी शैलीत त्यांनी अमित शाह यांनाही आव्हान दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना अजून एक धक्का | मुंबईतील सरकारी कामासाठी चेन्नईमध्ये मुलाखती
Aaditya Thackeray | युवासेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्यातील शिंदे सरकारवर प्रकल्पांबाबत घणाघाती आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनमुळे राज्याचं किती नुकसान झालं याची आठवण करुन दिली. बल्कड्रग पार्कही राज्याबाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आठवण करुन दिली, पण आदित्य ठाकरे यावरच थांबले नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
आम्हीच शिवसेना म्हणणारे शिंदे भाजपच्या नियंत्रणात? | सेनेच्या वाट्याची जागा भाजपच्या विवादित गुजराती उमेदवाराला जाहीर, 40 समर्थकांना इशारा?
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदिपान भुमरे, प्रकाश सुर्वे, दादा भुसे असणार आहेत. उदय सामंत सकाळीच दिल्लीला पोहोचले आहेत. त्याला ग्राम पंचायत निवडणुकीतील अपयशाची पाश्वभुमी असल्याचं वृत्त आहे. ४० आमदार आणि १२ खासदार असूनही शिंदे गट आणि शिवसेना यांना मिळालेल्या एकूण जागांमधील फरक हा केवळ ३-४ जागांचा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | राज्याच्या भल्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, अशी जाहीर घोषणा रामदास कदमांनी केली होती
Ramdas Kadam | आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कुणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?’, रामदास कदम उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
40 आमदार, 12 खासदार असूनही ग्रामपंचायत निवडणुकीतील शिंदे गटाच्या अपयशावर दिल्ली भाजपाची चर्चा, शिंदेंना दिल्लीत बोलावलं
CM Eknath Shinde | ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला सरशी झाल्याचं पहायला मिळतंय. 594 ग्रामपंचायतींपैकी 258 ग्रामपंचायतींवर मविआने विजय मिळवलाय. तर भाजप-शिंदे गटाने 228 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर पहायला मिळली. भाजपने 188 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादीने 136 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांना घेऊन दिल्लीवाऱ्या नेमक्या कशासाठी?, धक्कादायक आणि महत्वाची माहिती समोर येतेय
CM Eknath Shinde | महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे आपल्यासोबत 40 आमदारांनीही घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत. मात्र भाजपच्या गोटातून मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार शिंदे गटातील आमदारांची दिल्लीतील परेड ही निवडणूक आयोगाशी संबंधित असल्याचं जातंय, मात्र कारण दुसरंच आहे. त्याचा थेट संबंध वेदान्तासोबत जोडला जातोय, पण ते पूर्णपणे कथित असल्याचं वृत्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचा दणका, अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश, दंडही ठोठवण्यात आला
Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात काही फेरफार करण्यात आले असून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच राणे यांना 10 लाखांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. राणे यांनी CRZ आणि FSI नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.
2 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायतीतही 'शिल्लक' न राहिलेल्या मनसेचे पदाधिकारी अजूनही पक्षकार्यापेक्षा शिवसेनेला टोमणे मारण्यात व्यस्त?
MNS Gajanan Kale | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची संमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा ही ठाकरेंचीच आहे.
2 वर्षांपूर्वी -
'तुम्हाला फक्त स्वतःचीच काळजी आहे, पंतप्रधान मोदी साहेब', असे पत्र लिहून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, राज्य सरकारवरही दोष
Farmer Suicide | कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि तुटलेल्या दशरथ एल. केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) अभिनंदन केले आणि त्यानंतर तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. केदारी यांनी एक सुसाईड नोटही मागे ठेवली होती, ज्यात लिहिले होते की, “आम्ही काय करू शकतो? तुम्हाला फक्त स्वत:ची काळजी आहे मोदी साहेब. आम्ही भीक मागत नाही आहोत, पण आपल्यामुळे काय बरोबर आहे?, आम्हाला एमएसपी दिली पाहिजे कारण सावकार आम्हाला धमकावत आहेत. शेतकऱ्यांसारखी जोखीम कोणी घेत नाही, आमच्या तक्रारी घेऊन आम्ही कुठे जाऊ?
2 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत ना पक्षाच्या चिन्हाचा संबंध असतो, ना पक्षाचा, ना नेत्याचा | जनतेला प्रभावित करण्यासाठी ठराविक माध्यमांचा खेळ?
Gram Panchayat 2022 | राज्य निवडणूक आयोगाने 16 जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर केल्या होत्या. यातील 51 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध पार पडल्या होत्या. तर 547 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते. यासाठी 66.10 टक्के मतदान पार पडले होते. सोबतच सरपंचपदाच्याही थेट जनतेतून निवडणुका पार पडल्या होत्या. मागील काही काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुट आणि सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागले होते.
2 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट | सरकार पाडण्यासाठी दीड वर्षांपासून षडयंत्र चालू होतं, पैसे घेऊन सत्तांतर घडवलं, माझ्याकडे क्लिप आहेत - आ. देशमुख
MLA Nitin Deshmukh | एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यांच्यासोबत आमदार नितीन देशमुखही होते. सूरतला गेलेले नितीन देशमुख परत आले. त्यांच्या परतीचे किस्से बरेच चर्चिले गेले. त्याच आमदार नितीन देशमुखांनी आता सत्तांतराबद्दल महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. पैशांच्या बळावर सत्तांतर झालं असून, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराच देशमुखांनी शिंदेंना दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे सर्मथकांनी मर्यादा ओलांडल्या, उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याच्या नादात कदमांनी बाळासाहेबांच्या पत्नीचा अप्रत्यक्ष अपमान केला
Ramdas Kadam | आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर वेदांता कंपनीसोबतच्या सामंजस्य कराराची तारीख ठरलेली | अखेरच्या क्षणी बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा घात कोणी केला?
Vedanta Project | सध्या वेदांताचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. राज्याच्या उद्योग मंत्र्यांनाच प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हते असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले.
2 वर्षांपूर्वी -
स्वतःच गुजरातची तुलना पाकिस्तानसोबत करणाऱ्या फडणवीसांची आदित्य ठाकरेंच्या प्रतिप्रश्नावर केविलवाणी प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले
DCM Devendra Fadnavis | काल वेदांता प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की गुजरात हा देखील देशातीलच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले होते. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता असं सांगणारे फडणवीस फसले, शिंदेंच्या त्या माहितीमुळे खोटं उघड
DCM Devendra Fadnavis | वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Project | गुजरात आमचा लहान भाऊच आहेत, ते पाकिस्तान थोडेच आहेत, असं सांगताना फडणवीसांची पत्रकारांवरच टीका
DCM Devendra Fadnavis | वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.
2 वर्षांपूर्वी -
आपल्याकडील केंद्रीय मंत्रालयाचा राज्याला काय फायदा होतोय हे न सांगता, राणेंनी शिवसैनिक अन गद्दारातील फरक सांगितला
Union Minister Narayan Rane | लघुउद्योग भारती संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जातं आहे. या अधिवेशनात उद्योजक आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांचीही चर्चा करतात. कोरोनामुळे दोन वर्षे हे अधिवेशन होऊ शकलंल नव्हतं.
2 वर्षांपूर्वी -
Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेत तुफान गर्दी, महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती, शिंदें गटाला केलं लक्ष
Aaditya Thackeray on Konkan Tour | युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आजच्या रत्नागिरीतील सभेत तुफान गर्दी जमल्याचं पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यामध्ये महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान, शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरेंच्या झालेल्या आजच्या सभेमध्ये आदित्य शाहरुखच्या 29 वर्ष जुन्या सिनेमातील डायलॉग वापरुन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसले. ‘हारके भी जितने वाले को बाजीगर कहते’, म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | तरुणांनो तुम्ही भाजीवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला ऐकलं असेल, पण ते 'वेदांतवाला' काय आहे भाऊ?, मग हा व्हायरल व्हिडिओ पहा
Video Viral | फॉक्सकॉन-वेदांता संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर आणि फॅब डिस्ले निर्मिती प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र, गुजरातला गेल्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय.पत्रकार परिषदेत शरद पवारांनी फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. तसेच केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दलही मत मांडलं.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER