महत्वाच्या बातम्या
-
विवेक राहाडे आत्महत्या | सुसाइड नोट निघाली बनावट | मृत्यूचा भावनिक फायदा घेण्याचा प्रयत्न
बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती.
4 वर्षांपूर्वी -
गरीब रुग्णांचे मृत्यू थांबवा | फडणवीस यांचं पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र
‘महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी सिरमची लस घेतली | पण ती कोरोनाची नव्हे | पवारांचं स्पष्टीकरण
मी घेतलेली लस करोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
१० ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही | मराठा समाजात दोन गट
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. 9 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या । बुधवार पेठेत तणावाचं वातावरण
पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा आरक्षणाच्या निकालापर्यंत पुढे ढकला | अन्यथा परीक्षा उधळून लावू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भात आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exams | विद्यार्थ्यांची संख्या २६ लाखांपर्यंत वाढली | आयोगाकडे कर्मचार्यांचा तुटवडा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांहून २६ लाखांपर्यंत वाढली आहे. मात्र , राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केले जात आहे. त्यामुळे आयोगाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.
4 वर्षांपूर्वी -
विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात आग पेटवली आहे | त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होईल - पार्थ पवार
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे ट्वीट असून त्यामुळं पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दिवसभरात १९,१६३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले | ४८१ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात Coronavius च्या नवीन रुग्णांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात थोडी कमी येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पण Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांत वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी
राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Navratri 2020 | नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या Navratri 2020 नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत जातीपातीचं राजकारण | गंभीर आरोप करत शिवसैनिकाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसेनेतील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यानं याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेत जातीचं राजकारण केले जात असल्याचे या पत्रात स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
MH-CET 2020 Exams | उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी पुन्हा पुढे ढकलल्या
MHT-CET Revised Dates 2020: सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी झाल्यानंतर आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता ऑक्टोबर मध्ये तारखांत पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राऊतांना भेटीसाठी २ तास देत फडणवीसांनी राजकीय अस्थिरतेचा सापळा रचला? - राजकीय ठोकताळा
तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल २ तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच | शिवसेनेनं फूट पाडणाऱ्यांना फटकारलं
‘सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे’ असं म्हणत शिवसेनेनं मराठा आरक्षणावरून राजकारण करणाऱ्यांना फटकारून काढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसहित महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार - अनिल परब
राज्यात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यातील भेटीची चर्चा सुरू आहे. फडणवीस-राऊत यांच्यातील भेटीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चरस-गांजा संबंधित विधानावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात एनसीबीकडे तक्रार
आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी वृत्त वाहिनीवर केले. त्याविरोधात बारामती येथील अॅड. भार्गव पाटसकर यांनी नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी) कडे जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित | अन्यथा चौकाचौकात नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू
यातच काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला एसटीचा दाखला द्यावा यासाठी ढोल बजाओ, सरकार जगाओ हे आंदोलन केले, त्यांनी धनगर एसटी आरक्षण द्या अशी मागणी केली. मात्र धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे, धनगर समाजाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसुचित जमातीत केला आहे. मात्र गेल्या ७० वर्षापासून अनुसुचित जमातीत असून आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे आता केंद्र सरकारने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये असं धनगर समाजाचे नेते अँड दिलीप एडतकर यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News