महत्वाच्या बातम्या
-
हिमाचलच्या टेकडावर जन्मलेल्या नटीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये
कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्यानंतर माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी सारवासारव करणारी अभिनेत्री कंगना राणावतवर शेतकरी नेत्यांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा | देशाची परिस्थिती सध्या बिकट
‘करोनाची महासाथ, चीनशी संघर्ष आणि अर्थव्यवस्था या सर्वच आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा… देशाची परिस्थिती बिकट आहे हेच वास्तव आहे,’ अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगता | मग कांद्या निर्यात बंदी का करता
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. एकाबाजूला केंद्र सरकार कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगतं मात्र दुसऱ्या बाजूला कांद्या निर्यात बंदी करत हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे | पवारांचा विरोधकांना टोला
कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल
यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरती २०२० साठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रातही एकत्र असायला हवं | सभात्यागाचं सेना-राष्ट्रवादीला विचारा - अशोक चव्हाण
केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं. या विधेयकाला शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला, तर राज्यसभेतून त्यांनी वॉकआऊट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाविरोधात लोकसभेत भाषण केलं, पण राज्यसभेत मतदानाच्यावेळी राष्ट्रवादीनेही शिवसेनेप्रमाणेच वॉकआऊट केलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यसभेतून वॉकआऊट केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित केले गेले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा | ठाकरे सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Private Naukri | राज्य सरकारचा उपक्रम | ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
कोरोना विषाणूमुळे सध्या अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. सध्या लॉक डाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी, आर्थिक बाबी पूर्वपदावर येण्यास बराच काळ लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने 18 ते 23 सप्टेबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात 3,401 पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहेत. एम्प्लॉयरकडून उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे | कृषी विधेयकावरून फडणवीसांचा टोला
‘शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. त्यांना अनेक मुद्द्यांवर भूमिकाच घेता येत नाही आणि आता तर त्यांना त्यांची सवयही झाली आहे. यात आम्हालाही आता नवल वाटत नाही,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी विधेयकावरील आक्षेप बेगडी | कॉंग्रेस लबाडी करतंय | फडणवीसांचं टीकास्त्र
शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज कोरोनाचे २०,५९८ रुग्ण वाढले | तर ४५५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक झालं आहे. 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरून 73वर गेली आहे. आत्तापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 598 नवे रुग्ण सापडले. तर 455 रुग्णांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलीस भरती २०२० | २५ ते ३० लाख अर्ज येण्याचा अंदाज - गृहमंत्री
सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – CBDT) तशी विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक | मुंबईत जागोजागी ठिय्या आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला असून आज (20 सप्टेंबर) मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येतं आहेत..
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशीभविष्य | रविवार | २० सप्टेंबर २०२०
दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.
4 वर्षांपूर्वी -
तोंडाला मास्क नसल्याने पेट्रोल देण्यास नकार | पेट्रोल पंपाची केली तोडफोड
येथील माणिकपूर परिसातील पेट्रोलपंपवर तुफान राडा झाला. वसई पश्चिमेकडील या पेट्रोलपंपावर १० ते १२ जणांनी धिंगाणा करत पेट्रोलपंपची तोडफोड केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंपचालकांनी नकार दिला. हा राग मनात धरुन तरुणांनी पेट्रोलपंपवर येवून तोडफोड केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहिली प्रवेशासाठी जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलला | मुख्याध्यापकांचा तो अधिकारच काढला
राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे. आता ३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश घेता येईल.(Age cut-off date relaxed for nursery, Class 1 admissions in Maharashtra) याचा अर्थ असा की ३१ डिसेंबरआधी मूल सहा वर्षांचे झाले तर त्याला पहिलीत प्रवेश मिळू शकेल. प्रवेशासाठी पुढील वर्षाच्या जूनपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. याच निकषावर नर्सरी, प्ले स्कूल, बालवाड्या यांचेही प्रवेश होतील. सर्व बोर्डांना हा नियम लागू आहे.
4 वर्षांपूर्वी -
युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो - फडणवीस
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ देत फडणवीस यांनी युती करून चूक केल्याची कबुली अप्रत्यक्षपणे दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही | पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय - संजय राऊत
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मिळालेली स्थगिती कशी उठवली जावी, यावर मंथन सुरु आहे. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केला होता. आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई सुरु असताना फडणवीसांना आताच जात का आठवली? असा प्रश्न विचारला जात आहे अशी चर्चा सुरु झाली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा