महत्वाच्या बातम्या
-
केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यात शाळांबाबत निर्णय | शिक्षणमंत्र्यांची माहिती
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
पार्थ पवार भाजपमध्ये येणार नाहीत आणि आले तरी आम्ही घेणार नाही - खा. गिरीश बापट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११,१११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | २८८ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज दिवसभरात राज्यात 11,111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 288 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आर्थिक अडचणींमुळे कुटुंबीयांची आणि राज ठाकरेंची माफी मागत शहराध्यक्षाची आत्महत्या
अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनसेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह | एकाचा मृत्यू
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार २९० झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले ९ हजार ८५० जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३१५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत | आ. रोहित पवार यांची मागणी
अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस कुठले पंचांग वापरतात माहिती नाही | मात्र त्यांचे मुहूर्त चुकत आहेत - हसन मुश्रीफ
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजित बदल्या पुढे ढकलण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीस यांच्यावर तात्काळ पलटवार करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे | देवेंद्र फडणवीस यांचा टोला
आम्हाला सध्या राजकारणापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की, राज्यात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाविकासघाडीत अंतर्गत कलह वाढलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काय सुरू आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. बदल्यासंदर्भात जे काय सुरू आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
स्वपक्षीय आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून बनाव, गुलाबराव पाटील बरसले
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात योग्य तपास करण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच याच मुद्द्यावरून ठाकरे सरकार अडचणीत येईल, असाही दावा कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर प्रतिहल्ला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो | राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली.
4 वर्षांपूर्वी -
ते त्यांचे वैयक्तिक मत असावे | शिवसेनेने दिलेला त्रास आम्ही कधीही विसरणार नाही - संतोष धुरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली. मात्र, समाज माध्यमांवर अविनाश जाधव यांना झालेल्या त्रासापासून ते अनेक प्रकरणांचा हवाला देत महाराष्ट्र सैनिक यावरून असहमती दाखवत आहेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या राजकारणामुळे अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. मात्र शिवसेनेतून नेहमी आपल्या विरोधातच सुरु असतो, मग आपले नेते त्यांच्या पाठीशी का उभे राहतात तेच समजत नाही असं कार्यकर्ते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी खुशखबर | राज्यातील १० लाख कामगारांना लाभ मिळणार
कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन वाढतच गेला. त्यामुळे उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली होती. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतलं होता आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
पक्षाची धुरा संभाळणाऱ्यांना अनेकदा कटू बोलावे लागते | सेनेकडून पवारांचं समर्थन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याच्या भूमिकेवरुन जाहीर भाष्य केले. त्यानंतर पार्थ कमालीचा नाराज झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी बहीण खासदार सुप्रिया सुळे गेल्यात. त्यांच्यात काय चर्चा झाली ती पुढे आलेली नाही. पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पार्थसह अजितदादा नाराज होते. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. त्यावेळी अजित पवार यांची समजूत काढत मनधरणी केल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आताही शरद पवार यांनी नातू पार्थ याला शाब्दीक फटकरल्यानंतर कटुतेची भावना वाढीस लागली. यावरुन दोन दिवस बैठका होत आहेत. आता शिवसेनेने पार्थ पवार लहान आहेत. ते राजकारणात नवीन आहेत, असे सांगत शरद पवार वेगळ वागले नाहीत, असे शिवसेने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारमधील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची मोहिते-पाटील पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री विजयसिंह व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या पिता-पुत्रांनी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांना त्यांचे जाणे जिव्हारी लागले होते. पण आता सत्तेत आल्यानंतर पवारांनी या पिता-पुत्रांना शह देण्याची रणनीती आखली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसाठी पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत
राष्ट्रवादीचे प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
एका ट्विटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला | पण मी ती चूक सुधारली
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
नीट परीक्षेमुळे MPSC राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली
एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली.
4 वर्षांपूर्वी -
पार्थ पवारांचं जय श्रीराम ते CBI | शरद पवारांनी त्यांच्याबद्दल इतकी टोकाची प्रतिक्रिया का दिली?
सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाची घोषणा होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today