महत्वाच्या बातम्या
-
विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार
कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली. गावाकडे तोंड करून असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती, मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Corona Virus | आज राज्यात १०,४८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना व्हायरसचा राज्यात वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता वाढवणारा विषय ठरत आहे. काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हं दिसत नाहीत, तोच राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा नवी आव्हानं उभी करत आहे. शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात एकूण १०४८३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बळीराजा दुर्लक्षितच | गेल्या ६ महिन्यांत राज्यात रोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
करोनाच्या संकटाने राज्याचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्रामुळे राज्य सरकारसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून या महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | बिहार निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी हा भाजपचा महाराष्ट्र द्रोह
महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
वीज बिल झटका | सामान्य ग्राहक, नेते मंडळी ते सेलिब्रेटी अशी सर्वांचीच लूट
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोशल डिस्टन्स | अजित पवारांकडून मनसे नगरसेवकाचा एकेरी शब्दात अपमान
राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशीही १० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ११ हजार ५१४ इतके रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक हादरलं | एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या
नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य आणि उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट? भाजप IT सेल कार्यरत होतोय?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोठी बातमी | राज्यात आज ११,५१४ नवे कोरोना रुग्ण, ३१६ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही १० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ हजार ५१४ इतके रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती. खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
5 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान केले
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
5 वर्षांपूर्वी -
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सांगलीत पुराचा धोका
जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली
कोल्हापुरात सध्या पावसाचा कहर सुरु असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने यावर नियंत्रणासाठी शहरात एनडीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केर्ली ते केर्ले दरम्यान स्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग काही काळ बंद झाला होता, मात्र पाणी ओसरु लागल्याने तो पुन्हा सुरु झाला आहे. तरी ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये श्रीरामाच्या फोटोची आरती करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक
अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
खुर्ची गेल्याची तडफड होतेय, असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटतंय? - अनिल परब
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. आज अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकण गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन कालावधी १० दिवसांवर
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - अविनाश जाधव यांची गाडी गेटवर थांबलीच नव्हती, मग ती नोंद षडयंत्र?
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवार यांनी कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केला
आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं.
5 वर्षांपूर्वी -
अविनाश जाधवांना २ दिवसांची पोलीस कोठडी, महाराष्ट्र सैनिकांची एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी
मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना आज (1 ऑगस्ट) ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M