महत्वाच्या बातम्या
-
दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. साधारण राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासात ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची नोंद, तर २८२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाबाबत MIM आणि मुख्यमंत्र्यांचं मत एकसारखंच - फडणवीस
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
पण मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरलंही पाहिजे, शरद पवारांचा सूर बदलला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने परिस्थिती गंभीर असल्याने राम मंदिराच्या भूमिपूजनाला निमंत्रण आलं तरी जाणार नाही
अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
होय, महाविकास आघाडीतील काही नेते अस्वस्थ आहेत, पवारांच्या विधानाने खळबळ
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
...तर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही
उद्धव ठाकरे हे मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करताय. काही मराठा समाजातील लोक दलाली करताय त्यांचाही लवकर बंदोबस्त करू’ असे नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटले. पुण्यात मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आंदोलनतील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्वरित मार्गी लावावा अन्यथा वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ९ ऑगस्ट पर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर सत्तेतील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ती मुलाखत बघून शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून डोकी भिंतीवर आपटली असतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजप शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार, पण निवडणुका स्वतंत्रपणेच लढवू - चंद्रकांत पाटील
काल झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.
5 वर्षांपूर्वी -
राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही हे राजेश क्षीरसागर सारख्यांना माहित आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात ४७ हजार ७०४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ६५४ रुग्णांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार
महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात दोन साधूंसह चालक अशा तीन जणांना ठार मारले गेले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारे दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी कामाला लागण्याचे केंद्रातून आदेश
आज झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळचे युतीमधील सहकारी असलेल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आई भवानी उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य देवो अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हे सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सरकार किमान चालवून दाखवावे, तुम्ही एकमेकांचे हातपाय मोडायला सक्षम आहात. तसेचे हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर धोक्याने सत्तेवर आलेले सरकार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच सामनामधील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे या सरकारचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडेच आहे. मात्र त्यामधून कुठे जायचं हे मात्र मागे बसलेले ठरवतात, अशी टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात - फडणवीस
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती आहे मात्र कुठे जायचं ते मागे बसलेले ठरवतात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर नेमक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. मात्र सामनाला मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतल्या वक्तव्यावरुन त्यांनी टीकाही केली. महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही - देवेंद्र फडणवीस
राज्यातील साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाह यांना कशामुळे भेटलो इतकंही यांना माहिती नाही,” असा टोला लगावत फडणवीसांनी भेटीमागील कारण सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी गेल्या सहा वर्षात मीडियाला मुलाखत दिली का? - शिवसेनेचं प्रतिउत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर काल भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
एक ट्विट आणि दादा सुपरहिट! गाडीचं स्टिअरिंग स्वतःकडे ठेवत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक फोटो ट्वीट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारचा भीषण कारभार, क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना एक्सपायर्ड डेटेड मेडिसिन
राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर काल २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
ती कंपनी भाजपाशीसंबंधित नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाकडून क्लिन चीट
या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या आपल्या अंतरिम अहवालात त्या प्रक्रियेला क्लिन चीट दिली आहे. इंडिया टूडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धवजी खुदा बनू नका! लोकं कोरोनाने नव्हे तर रोजगार गेल्याने मरतील - प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M