महत्वाच्या बातम्या
-
पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न - चंद्रकांत पाटील
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखणे हे दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणांसाठी मोठेच आव्हान ठरत आहे. रुग्णसंख्येला निर्बंध घालावा तर कसा याचे आकलन न झाल्यामुळे सर्वत्र संभ्रमाची परिस्थिती दिसून येत आहे. त्याच संभ्रमावस्थेतून लागू करण्यात आलेल्या मागील दहा दिवसांच्या टाळेबंदीत पुणे जिल्ह्य़ात थोडेथोडके नव्हे तर २२,१६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यांमध्ये पुणे शहरातील १२ हजारांहून अधिक तर पिंपरी चिंचवडमधील सहा हजार रुग्णांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे: रुग्णांवर भरमसाट बिल आकारणाऱ्या खाजगी इस्पितळाचा परवाना रद्द
जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार ५२४ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७५ हजार ४४६ वर पोहोचली आहे. तर, दिवभरात ३७ करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा २ हजार ८३ इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना संताजी-धनाजीसारखे सर्वत्र फडणवीसच दिसतात - प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इयत्ता १ ली ते १२ वीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी घटवला, राज्य सरकारची मंजुरी
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसेनंतर भाजप नेत्यांच्या इंदुरीकर महाराजांसोबत भेटीगाठी
प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अभिजित पानसे इंदोरीकर महाराजांच्या भेटीला पोहोचल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडून हालचाली नाही, गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसे गाड्या सोडणार
कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला आहे. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वॉशिंग्टन पोस्टनंही म्हटलं की मुंबईत रूग्ण आकडेवारीची लपवाछपवी झाली नाही - मुख्यमंत्री
“जनतेवर आणि यंत्रणेवर माझा विश्वास आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनासाठी राबवल्या जाणाऱ्या धारावी पॅटर्नचा उल्लेख केला. ही नक्कीच आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. नुकतच वॉशिंग्टन पोस्टनंही म्हटलं की मुंबई हे असं शहर आहे ज्यानं कोणतीही आकडेवारीची लपवाछपवी केली नाही. त्यांनी आपल्याबद्दल अशी माहिती देणं ही नक्कीच गौरवाची गोष्ट आहे. म्हणूनची मी आकडेवरी लपवली किंवा अशा काही वक्तव्यांवर लक्ष देत नाही,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ९ हजार ६१५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७८ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत ९६१५ रुग्ण सापडले आहेत. तर २७८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या ३,५१,११७ वर गेली आहे. तर Active रुग्णांचा आकडा १,४३, ७१४ एवढा झाला आहे. तर ५७१४ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातल्या मृत्यूची एकूण संख्या ही १३ हजार १३५ एवढी झाली आहे. मुंबईत आज १०५७ नवे रुग्ण सापडले. तर ५४ जणांचा मृत्यू झाला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना इंजेक्शन असो की ई-पास...बिनधास्तपणे काळाबाजार
कोरोनाचा रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत आल्यावर त्याला देण्यात येणारे टोलसीझुबम हे महागडे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकणाऱ्या उल्हासनगरातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फूड अँड ड्रग्ज शाखेने सापळा रचून गजाआड केले आहे. यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी वर्तवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ, पवारांकडून चिंता व्यक्त
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर चिंता व्यक्त करत पवार यांनी डॉक्टरांनाही इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार कोकणात विशेष रेल्वे सोडायला तयार, ठाकरे सरकारकडून मागणीच नाही - आ. आशिष शेलार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये २ दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा निर्णय
राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने BJP IT सेल संबंधित कंपनीला नियुक्त केलं होतं?
महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात इयत्ता तिसरी ते १२ वीसाठी Jio TV वर एकूण १२ चॅनेल्स सुरु
एकीकडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागायला विलंब झाला आहे. १६ जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद, २९८ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
व्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं, काँग्रेस खासदाराने आक्षेप घेतल्याने समज दिली - खा. उदयनराजे
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केरळमधील घटनेवरून महाराष्ट्र सरकारचा युजीसवर निशाणा
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद, तर २८० जणांचा मृत्यू
मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुन्हा वाद! मंत्री एकनाथ शिंदेबाबत काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार
महाविकास आघाडीतील कुरबुरी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. एक मिटल्यावर दुसरा वाद उफाळून येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाही, तसेच त्यांच्या महत्वपूर्ण कामाच्या फाईल्स अडवून ठेवत असल्याबद्दल चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी उघडपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याने, आघाडीतील बेबनाव पून्हा समोर आला आहे. शिवसेना मंत्र्यांना समज द्यावी व कॉग्रेसच्या आमदारांचा सन्मान करावा अशी मागणी केल्याने आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, किती दिवस लोकांना घरात बसा सांगणार
आज देशातील राज्यसभेच्या नवनिर्वाचित 61 पैकी 44 खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या खासदारांना शपथ दिली. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी यावेळी हिंदीतून शपथ घेतली. तर उदयनराजे भोसले व व रामदास आठवले यांनी इंग्रजीतून गोपनीयतेची व एकनिष्ठतेची शपथ घेतली. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी चक्क मराठीतून शपथ घेतली. काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपाचे भागवत कराड यांनीही मराठीतून शपथ घेतली. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे फौजिया खान या शपथविधीला हजर नव्हत्या.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC