महत्वाच्या बातम्या
-
पुणेकरांना जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउनमधून एकदिवसाचा दिलासा
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दहा दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती.
4 वर्षांपूर्वी -
राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्र भाजपने ५०० कोटी जमा केल्याचा आरोप बिनबुडाचा - दरेकर
राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाइन, पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री गडाख यांचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. आता गडाखांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे, शेलार, तावडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळण्याची शक्यता..खडसे अधांतरी
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र दिल्लीत गेल्यानंतर राज्यातील काही मंत्र्यांसाठी त्यांनी खुश खबर आणली आहे. कारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद ताडवे, संभाजी-निलंगेकर पाटील यांना स्थान मिळाल्याचं समोर येतंय. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती मिळालीी नसू भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासोबत फडणवीस आज भेट घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महिला सर्वत्र असुरक्षित, त्या बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत - शालिनी ठाकरे
नवी मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला होता. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
६ कोरोना योद्धाचं निलंबन, कोरोना आपत्तीत वसई-विरार आयुक्तांचं फुलटाईम राजकारण
सध्या वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती चिंताजनक असली महत्वाचं विद्यमान पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना फुलटाईम राजकारण करण्यातच रस असल्याचं पाहायला मिळतंय. वास्तविक साध्याचं वसई विरारमधील त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. यापूर्वी देखील अधिकारांचा गैरवापर केल्याने मुंबई हायकोर्टात खटला दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता येण्याचं लॉलीपॉप दाखवत आहेत - भुजबळ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे. तसेच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा राज्यातील सरकार पडणार अशी चर्चा सुरु झाली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून विक्री, मराठी युवकाचा 'Next Fresh' ब्रॅण्ड नफ्यात
जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासात ८,३०८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू
राज्यामध्ये सलग दोन दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ८ हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ८,३०८ रुग्ण वाढले आहेत, तर २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले आहेत. मुंबईत आजच्या दिवसात १,२९४ तर पुण्यात १,५३९ रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात ६२ जणांचा मृत्यू झाला, तर पुणे मनपा क्षेत्रात २१ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार - ANI वृत्त
मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला आहे. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बकरी ईदसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
बकरी ईदसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती हे सरकारचं नाटक, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीला विरोध - प्रकाश आंबेडकर
युद्ध असले तरीही निवडणुका घेतल्याच पाहिजेत असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. एवढंच नाही तर करोना हे सरकारचं नाटक असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. करोनाच्या नावाने सरकार आपलंच राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही - फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. आम्हाला सरकार पाडण्यात काहीही कुठलाही रस नाही. आत्ता कोरोनाची लढाई सुरु आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही भेट होती. महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मी अमित शाह यांच्या कानावर घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घातली आहे. तसंच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२,५३८ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य गृहविभागाला आदेश
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. कारण, राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
इयत्ता ८वीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखाबाबत बालभारतीचं स्पष्टीकरण
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात मोठी चूक झाल्याचं उघडकीस आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन शिक्षणातून काहीच समजत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या
कोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
4 वर्षांपूर्वी -
कर्मचारी महिला पदवीधर टंकलेखक, पालिका आयुक्त सांगायचे घरी झाडू-भांडी घासायला
पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना अपशब्द केल्याप्रकरणी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला विरार पोलिसांनी काल अटक केली होती. मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन करत पालिका आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! राज्यात आज ८६४१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१ एकूण रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत २६६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यात ३.९४ टक्के मृत्यूदर असल्याचं सांगण्यात येतय. तर आज ५५२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON