महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रात ६ हजार ७८५ नवे कोरोना रुग्ण, तर २१९ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवात कोकणात जाताय? पण जिल्हाधिकाऱ्यांकडून बंधनं
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक, मुख्यमंत्र्यांची व्हीसीद्वारे बैठक
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या, जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, ATKT'च्या विद्यार्थ्यांनीही दिलासा - उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही - देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो’, असा टोला त्यांनी लगावला.
5 वर्षांपूर्वी -
जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा - गजानन काळे
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
पारनेरचे ते ५ शिवसेना नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते - अजित पवार
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ६ हजार ६०३ नवे कोरोना रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील देवाणघेवाण, राष्ट्रवादी शिवसेनेला त्यांचे नगरसेवक परत देणार
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू
कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असं या नगरसेवकांचं नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे कोरोना रुग्ण, २२४ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांना वारंवार मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नव्हे
भाजपने यावरून मातोश्री दौऱ्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण
पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
लागा तयारीला, महाविकास आघाडी सरकारचा १० हजार पोलीस शिपाई भरतीचा निर्णय
अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीतही फडणवीस रोज फिरतायंत, अन उद्धव ठाकरे मातोश्रीतच - चंद्रकांत पाटील
चीनमधून सुरू झालेलं कोरोना व्हायरस नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं. भारतातही कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक टप्प्यांच्या लॉकडाऊननंतरही भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जावईशोध! Zoom App चीनी कंपनीचं, भाजप पुणे शहर अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Zoom App हे मूळचं अमेरिकन कंपनीचं असून, सदर कंपनीचं कार्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. तसेच सदर कंपनी अमेरिकेच्या नॅसडॅकवर देखील लिस्टेड आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५९ चिनी अँप्सवर सुरक्षेच्या कारणावरून बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजही अनेकांना कोणतं अँप नेमकं कोणत्या देशाशी संबंधित आहे याची कल्पना नसावी आणि यामध्ये भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचं समाज माध्यमांवर पाहायला मिळतं.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे
शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर बुधवारी अंतरिम आदेश
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय दिला नाही, तर येत्या बुधवारी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतरिम आदेशावर सुनावणी होईल, असे सांगितले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही असे मत व्यक्त केले. न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भोंगळ कारभार, कोरोना रुग्ण जिवंत असताना मृत्यू झाल्याचा कुटुंबियांना कॉल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० आहे, तर मुंबईत ही संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ४ हजार ९३८ आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today