महत्वाच्या बातम्या
-
आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे उत्तर आज मिळणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. परंतु सोबतच याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारचे किती दिवस शिल्लक हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात - प्रकाश आंबेडकर
अकोला येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्याकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यााथ्र्यांना प्रवेश दिला नाही. या धोरणामुळे २०१७ पासून ते आजपर्यंत ११ हजार विद्यााथ्र्यांना फटका बसला. देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाबाधितांच्या आकड्यात ५ हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आकडे समोर येत असताना आज आलेली आकडेवारी जरा दिलासा देणारी ठरली आहे. तसेच, आज २०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७ झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फक्त गोंधळ! महास्वयंम रोजगार पोर्टल असताना अजून 'महाजॉब्स' पोर्टल लाँच
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णांची लूट, रुग्ण व्यवस्थापनही कमतरता, ठाण्यात २-३ रुग्ण बेपत्ता - फडणवीस
ठाण्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मुंबईपेक्षा ठाण्याची परिस्थिती अधिक गंभरी होत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला भेट दिली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार-आमदार क्वारंटाईन
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.
4 वर्षांपूर्वी -
हे खरच सरकार नाही सर्कस आहे - आ. नितेश राणे
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राऊतांनी १२ आमदारांची काळजी करण्यापेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करावी - फडणवीस
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरून रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सरकार अस्थिरेच्या चर्चेनं डोकं वर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास सरकार पाडण्याची तयारी होत असल्याचा धक्कादायक दावा केला होता. सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यपद्धती निश्चित झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार
राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
युतीच्या सत्ताकाळात सुद्धा भाजप-शिवसेना नेत्यांचे असे पक्ष प्रवेश व्हायचे - अंकुश काकडे
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली. -
५ वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री म्हणणाऱ्या शिवसेनेलाच सतावतेय सरकार पडण्याची भीती
येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्र पुन्हा कोरोना रुग्ण संख्येने हादरला, ७०७४ नवे रुग्ण
महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने हादरुन गेला आहे. २४ तासांत राज्यात ७०७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २०००६४ वर गेली आहे. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ८६७१ वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या ८३२३७ वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत ४८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वादाशी मनसेचा संबंध नाही - राज ठाकरे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले होते. सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच अभिनेत्री संजना सांघी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. संजनाने सुशांतच्या ‘दिल बेचार’ या शेवटच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणात, YRF कास्टिंग डायरेक्टर आणि जलेबी स्टार अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह सर्वांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसताना मंत्र्यांसाठी गाड्या प्राथमिकता आहे का? - फडणवीस
मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनला विरोध नाही, पण लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं?
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास फोडाफोडी? शिवसेनेचे ५ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काल पार पडली. लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये नाराजी पसरल्याने आणि राज्य अधिकारीच चालवत असल्याच्या भावनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेवर नाराज असल्याने काल बैठका देखील पार पडल्या.
4 वर्षांपूर्वी -
सामान्यांना २ किमीच्या मर्यादा असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकला, चौकशीचे आदेश
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री प्रिया बेर्डे आज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON