महत्वाच्या बातम्या
-
जेष्ठ विधितज्ञ पी.एस. नरसिंहा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार
जेष्ठ विधितज्ञ पी.एस.नरसिंहा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार असल्याची माहिती ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील न्यायालयीन लढा लढत आहेत, येत्या ७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून विनोद पाटील यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. पी.एस.नरसिंहा हे देशातील नामांकित विधितज्ञ असून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाची केस लढली होती तसेच देशातील बीसीसीआय’सारख्या इतर प्रमुख केसेसमध्ये बाजू मांडलेली आहे. ते देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया होते.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच काही बर वाईट झाल तर सरकार जबाबदार राहील - विनोद पाटील
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केल्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य लॉकडाऊन की अनलॉक? पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे भ्रमित ठाकरे सरकार
महाराष्ट्रात कोरोना अजूनही मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे आणि त्यात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताने स्वीडनप्रमाणे हर्ट इम्युनिटी पद्धतीचा वापर केला पाहिजे - उदयनराजे भोसले
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पा ओलांडला असून या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४ हजार ८७८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१वर पोहोचली आहे. तर २४ तासांत २४५ कोरोनाबळींची नोंद झाली आहे. यापैकी ९५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील असून १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७५ हजार ९७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही महापूजा पार पडली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना यंदा मानाचे वारकरी म्हणून मान मिळाला. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा गाभारा फुलांनी सुंदर सजवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
५९ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, घोषणेप्रमाणे एकालाही भरपाई नाही, ठाकरे सरकारविरोधात संताप
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तुकाराम मुंढे यांची थेट पीएमओकडे तक्रार, नितीन गडकरींचा पुढाकार
मुंबई, पुणे शहरापाठोपाठ नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या तोंडावर संकटाशी दोन हात करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकाच्या पाच हॉस्पिटलचा कायापालट केला आहे. तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलं असं म्हणत, त्यांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत असताना नागपुरात महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटल्याचं पाहायला मिळालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले, 78 रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या 48 तासात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील 103 आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा 4.48 टक्के इतका आहे.
5 वर्षांपूर्वी -
काय लॉक आणि काय अनलॉक! हे सरकार पूर्णपणे कन्फ्युज - देवेंद्र फडणवीस
राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारचं ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू आहे. त्यामुळे ‘अनलॉक 2’ मध्ये कमालीचा गोंधळ आहे. सरकारच पूर्णपणे कन्फ्युज आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय लॉक आणि काय अनलॉक आहे, हे स्पष्ट करावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार, फडणवीस आणि दरेकरांचा आरोप
पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडकला उडाला आहे. दरवाढीविरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, दावाच विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि पवारांच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या भाजप आमदाराला कोरोना
पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदारासह त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. आमदार आणि त्याची पत्नी हे दोघे पिंपरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन एक्स्प्रेस वेवर पलटली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला. दरम्यान, स्वतः शरद पवार यांनी खाली उतरून जखमींची विचारपूस केली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या विरोधी गटातील अनेक नेते त्यांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, विरोधकांची काय चूक
भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत होता. त्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही असं विधान त्यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले होते. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र तीव्र झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
अब की बार..सतत इंधन दरवाढ...काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन
७ जूनपासून सलग होणाऱ्या इंधन दरवाढीला रविवारी ब्रेक लागला. मात्र आज सोमवारचा दिवस उजाडताच या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. देशभरात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावलेले असतानाच दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीनेही सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज सकाळी १० ते १२ या वेळत सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात सर्वाधिक ५४९३ कोरोना रूग्णांची वाढ
कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात पहिल्यादांच बाधित झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून आज उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रूग्णांचा आकडा १ लाख ६४ हजार ६२६ इतका झाला आहे. तर दोन हजार ३३० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
...म्हणून मन की बातमध्ये मोदींनी चीनचा उल्लेखही केला नाही - काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६ वा एपिसोड होता. यावेळी लडाख येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असणाऱ्या चकमकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी चीनचा उल्लेख न करता इशारा दिला आहे. भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो. आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळेवर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
एप्रिलमध्ये १ लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण, त्यापैकी ९८ हजार डॉक्टर अजून गायब
राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १.३० वाजता राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. राज्यात पुनश्च हरी ओम असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसंच राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण याबाबत ते कोणती नवी सूचना देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today