महत्वाच्या बातम्या
-
बहिण-भावाच्या हत्येने औरंगाबादमध्ये खळबळ
मंगळवारी रात्री उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण औरंगाबाद हादरले आहे. बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या सातारा परिसरातील एमआयटीजवळ ही घटना घडली. सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे अशी मृत युवकांची नावं असून त्यांच्या हत्येप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन
ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
5 वर्षांपूर्वी -
Unlock महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणार, आज २२५९ नवे कोरोना रुग्ण
अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
होम कोरंटाईनच्या संपर्कात आल्याने सेनेचे सिब्बल अनिल परब यांनी काळजी घ्यावी - आ. नितेश राणे
राज्यातील कोकणात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात कोकणासाठी कोरोना टेस्टसाठी देखील विशेष सोय नाही आणि त्यामुळे अडचणी वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांना होम कोरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करताना धक्कादायक माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात नव्या २५५३ रुग्णांची भर, १०९ रुग्णांचा मृत्यू, संख्या ८८ हजारांच्याही पुढे
आज राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांगलं काम करणारे भाजपामध्येच असतात याचा आम्हाला आनंद....सेनेचा आभारी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून अभिनेता सोनू सूदवर करण्यात आलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगले काम करणारी लोकं भाजपमध्येच असतात, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना वाढत असताना २० हजार परप्रांतीय नागरिक पुन्हा मुंबई-पुण्यात परतले
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी गावाकडे गेलेले परप्रांतीय नागरिक महाराष्ट्रात पुन्हा परतू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत आहेत. अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेमधून अंदाजे २० हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पहिले जे शिवसैनिक करायचे..तेच सोनू आता करतो आहे - आ. नितेश राणे
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८५,९७५ वर; मुंबईत एका दिवसात १,४२१ नवे रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. काल राज्यात ३ हजार ७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ९७५ वर पोहचला आहे. तर एका दिवसात ९१ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३ हजार ६० इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला
भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड
सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात २७३९ नवे कोरोना रुग्ण, १२० मृत्यू
राज्यात आज दिवसभरात २७३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट जुलैमध्येच सुरू होणार, आहार संघटनेचं स्पष्टीकरण
महाराष्ट्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी पण राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे
5 वर्षांपूर्वी
‘आहार’ संघटनेने स्पष्ट केले आहे. हॉटेल व्यवसायातील ८५ ते ९० टक्के कर्मचारी आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे ते परत येईपर्यंत आणि यासंदर्भातील अन्य व्यवस्था पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे ‘आहार’ चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे. -
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानेच
दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे घरातचं हा सोहाळा साजरा करण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तसंच नागरिकांना गतवर्षीचाच सोहळा सकाळी ९ वाजता दाखवणार असल्याचं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही - निलेश राणे
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी -
रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवत आहे - उपमुख्यमंत्री
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे सर्व नागरिकांना घरातच थांबावं लागले. त्यामुळे प्रदुषण तर कमी झालेच शिवाय… पक्षी आणि प्राण्यांना मोकळा श्वास घेता आल्याचं समोर आलं. मागील दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगा नदीसारख्या अनेक नद्या स्वच्छ तर झाल्याच शिवाय मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरातील प्रदुषण कमी झाले आहे. प्राणी आणि पक्षांनीही त्यामुळे मोकळा श्वास घेतला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वादळग्रस्त रायगडच्या दौऱ्यावर
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जिल्ह्यांसाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, अलिबाग या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा