महत्वाच्या बातम्या
-
खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के परिचारिकांचे राजीनामे; सरकारच्या अडचणीत वाढ
राज्यातील अनेक रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढतच आहे. खासगी रुग्णालयांसाठीदेखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच असे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया ऍडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचे नवे २०९१ रुग्ण; एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ३६००४ - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात आज २०९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत - मुख्य सचिव
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ ऍक्टिव्ह केसेस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासोबत अन्याय केला जात असल्याची भूमिका तयार केली जात आहे. खोटा प्रचार करून केंद्र सरकराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचू भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात १५ हजार ७८६ रुग्णांची कोरोनावर मात; तर ३५,१७८ रुग्णांवर उपचार सुरू
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सोमवारी राज्यात नव्या २ हजार ४३६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात १ हजार १८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १५ हजार ७८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, चिंता नसावी – संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले असून सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णासाठी डब्यातून जेवणासोबत दारू सुद्धा पाठवली
देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून याठिकाणी काल दिवसभरात ३,०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे १७२५ नवे रुग्ण आढळले. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित मंत्र्यांना अँब्युलन्स, इस्पितळ आणि बेड्स वेळेवर; सामान्यांचा वाली कोण?..सविस्तर
काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सावध राहा! राज्यात ७२% कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये ७१ टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यातही राज्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडे डॉक्टर-नर्सेसची कमतरता; मदतीसाठी केरळ सरकारला पत्र
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी ३ हजार रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३०४१ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे. यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मग ह्यापुढे महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची आणि पोलीसांची परवानगी घ्यावी लागेल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. रविवारी योगींनी ही माहिती दिली. यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं ही योगींनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार; पण सरकार धोका उचलणार?
देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस संक्रमणादरम्यान, महाराष्ट्र सरकार १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील.
5 वर्षांपूर्वी -
दुःखद! राज्यात तब्बल १६७१ पोलिसांना कोरोनाची बाधा, १८ मृत्यू
राज्यात कोरोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात २६०८ नवे कोरोना रुग्ण, ६० मृत्यू, एकूण संख्या ४७ हजारांच्या पुढे
राज्यात करोनामुळे आणखी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात करोनाचे २६०८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर त्याचवेळी ८२१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा ५० हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा ४७,१९० वर पोहचला आहे. सध्या प्रत्यक्षात ३२,२०१ करोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-पुण्यात तब्बल ४.८५ लाख लोकं होम क्वारंटाइन
सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: ससून इस्पितळात ५६ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय झाला आहे. मात्र त्यात अजून काही चिंता वाढविणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले पुण्यातील ५६ वर्षीय डॉक्टरांचा पुण्यातील ससून इस्पितळात कोरोनामुळे अखेर मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे - मुख्यमंत्री
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८ नवे रुग्ण; तर मुंबई पोलिसदलातही आकडा वाढतोय
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले. राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकीय निवृत्तीची घोषणा
मनसेचे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून निवृत्ती घेताना त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. जाधव यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today