महत्वाच्या बातम्या
-
चिंता वाढली! एका दिवसात महाराष्ट्रात १२३३ नवे कोरोना रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात दोन दिवसांत ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
नोकरभरती रद्द केल्याने अनेकांची वयाची मर्यादा संपुष्टात येईल; सरकारने विचार करावा
कोरोना आपत्तीने साऱ्या जगाला संकटात टाकून अगदी वेगाने फोफावत असतानाच आता त्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे कोरोनावर मात कशी करायची हा प्रश्न असतानाच भारतासह अनेक राष्ट्रांपुढे आव्हान आहे ते म्हणजे मंदावलेल्या आर्थिक चक्राला पुन्हा गती देण्याचं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील स्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणातून आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना, ग्रीन झोन संकटात
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुणांमध्ये नैराश्य येईल - विनोद पाटील
कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना मुंबईला जाण्यास मनाई
कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या हद्दीतून मुंबई-ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्यांना पुन्हा कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरात प्रवेश मिळणार नाही. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेशच या दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ८ तारखेपासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील रांजणोलीत १,००० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभं राहणार
ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणोली येथे एक हजार खाटांचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलाच्या आवारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच ही व्यवस्था उभी केली जात असून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे पोहचणे शक्य होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एवढी घाई का करताय? पुढे आयुष्यभर निवांत 'बसता' येईल ना! - आ. रोहित पवार
जवळपास दीड महिन्यानंतर दारूचा थेंब घशाखाली ओतायला मिळणार या आशेने दारूच्या दुकानांसमोर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या तळीरामांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मार्मिक भाषेत शालजोडीतून टोले लगावले आहेत. जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी घाई कसली करता? आता घरात थांबा. नंतर ‘निवांत’ बसा, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक विदेशात अडकले? हा फॉर्म भरा
देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याला याचा मोठा फटका बसला आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आणि करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच अनेक नव्या विकास योजना आणि भरती प्रक्रियांवर काही दिवसांसाठी स्थगिती आमली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली: राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर
मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिवसभरात कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले
महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज ६७८ नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १२९७४ एवढी झाली आहे. तर आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आज ११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत २११५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाईन शॉप खुले; सरकारने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवलंय - डॉ. अभय बंग
देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘गुजरात का चौकीदार’ असं लिहावं
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेड झोनमधील (कंटेन्मेंट झोन वगळून) काय सुरू करण्यास परवानगी...सविस्तर
राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
कंटेन्मेंट झोन वगळून मुंबई-पुण्यातही दारू विक्रीला परवानगी
राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
IFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही
IFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ७९० नवे कोरोना रुग्ण, ३६ मृत्यू, एकूण रुग्ण १२,२०० च्याही पुढे
महाराष्ट्रात ७९० नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आईचं ह्रदयविकाराने निधन, शेजाऱ्यांचा मदतीला नकार, मुस्लिम मित्र धावले आणि
दयविकारामुळे वयाच्या ७० व्या वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजारी कोरोनाच्या भीतीपोटी पुढे आले नाहीत. अखेरीस मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धावून आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज २६ मृत्यू; १००८ नवे रुग्ण, ११५०६ एकूण बाधित
राज्यात आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज करोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today