महत्वाच्या बातम्या
-
राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मान्यता
करोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित दादांचा 'बारामती पॅटर्न' जिंकणार, बारामतीत उरला केवळ एक कोरोना रुग्ण
शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) रेड झोनमधील नागरिकांची तपासणी युध्दपातळीवर सुरू असल्याने, आत्तापर्यंत लक्षणे दिसून न आलेले पण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्ती उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरूवारी एकाच दिवसात प्रथमच शंभरपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तब्बल १०४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८७६ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे
देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे.
5 वर्षांपूर्वी -
केडीएमसी'त कोरोना टेस्ट लॅबची उभारणी होणार; मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या तिजोरीत महसूल येण्यासाठी सरकारकडे वाईन शॉपचा पर्याय - राज ठाकरे
‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र CM फंडाला CSR लागू करावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
केवळ पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईतील महापे स्थित आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही सध्याच्या घडीची अत्यंत दिलासादायक बाब समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनातून सावरलेल्या एकूण ७२२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून त्यात २८१ महिलांचाही समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालघर हत्याकांड : जंगलात लपलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत
पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.
5 वर्षांपूर्वी -
पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.
5 वर्षांपूर्वी -
परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी
एकट्या मुंबईत ३४५१ कोरोनाबाधित असून १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात १५० कोरोनाबाधित असून ४ जण दगावले आहेत. तर ठाण्यात २२ जण बाधित असून २ जण दगावले आहेत. नवी मुंबईत ९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवली मनपात ९३ जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहरात चिंता वाढली...तबलिगींना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर इतरत्र हलवावे - आ. राजू पाटील
सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या रोगापासून आपली कल्याण डोंबिवली पण सुटू शकली नाही. यावर मनसेचे आमदार राजू पाटील मोठी चिंता व्यक्त करताना सरकारला देखील विनंती केली आहे. त्यावर सविस्तर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे की, सध्या कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. कल्याण-डोंबिवलीत हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवारांकडून तब्बल ३६ जिल्ह्यांना मोफत सॅनिटायझरचा पुरवठा
कर्जत-जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. त्यासाठी बारामती ॲग्रोची मदत त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे हे सॅनिटायझर रोहित पवार मोफत पुरवत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
घटना गैरसमजुतीतून घडली; आपत्तीच्या काळात राजकारण करणे चुकीचे
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.
5 वर्षांपूर्वी -
४६६ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ६६६ वर पोहचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचे संकट थोपवण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ मृतांसह राज्यातील मृतांचा आकडा हा २३२ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: ३१ कोरोना रुग्णांपैकी १४ रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी
राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४८३ वर पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामध्ये भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाली असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
पालघर नव्हे तर दादरा नगरहवेली-महाराष्ट्राच्या सीमेवर घटना घडली; हत्या प्रकरणी ११० जणांना अटक
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये - संजय राऊत
शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर घेण्याची मंत्रिमंडळाने शिफारस करुनही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. यावरुन राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. असंविधानिकरित्या वागणाऱ्यांना इतिहास माफ करत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे
पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना चाचण्या गुजरातच्या दुप्पट; राजस्थान द्वितीय क्रमांकावर
पीपीई किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: बच्चे कंपनीची ई-लर्निंग अर्थात ऑनलाईन अभ्यासाला पसंती; शाळांचे उपक्रम
करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र परिस्थिती अधिकच चिघळल्याने शाळा आणि कॉलेजेस अनिश्चित काळासाठी म्हणजे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON