महत्वाच्या बातम्या
-
लॉकडाउन: बच्चे कंपनीची ई-लर्निंग अर्थात ऑनलाईन अभ्यासाला पसंती; शाळांचे उपक्रम
करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र परिस्थिती अधिकच चिघळल्याने शाळा आणि कॉलेजेस अनिश्चित काळासाठी म्हणजे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा करणार
कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांकडून घरभाडे वसुली ३ महिने पुढे ढकला; सूचना प्रसिद्ध
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असून उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या काळात अनेकांचे आर्थिक उत्पन्नही थांबले आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्याने लोकांसमोर मोठं संकट उभं राहणार आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही घरभाडे भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लोकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयातून एक पत्रकच निर्गमित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
६ महिन्याच्या बाळासमोर कोरोना पराभूत...डिस्चार्ज; वाढवला सामान्यांचा आत्मविश्वास
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आतापर्यंत ६० रुग्णांपैकी २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मागील चार ते पाच दिवसात कल्याण-डोंबिवलीतील जवळपास ९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीत भाजप समर्थक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर महाराष्ट्र सैनिक उतरले बचावात
महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात परराज्यातील मजुरांची गर्दी जमल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच भाजपसमर्थकांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे राजीनामा द्या, अशी मागणी करत #UddhavResign हा ट्रेण्ड चालवला होता. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना राज ठाकरे यांच्या मनसेच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांचा विश्वास वाढावा; कोरोनातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा प्रसिद्ध करा
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. ‘कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. ह्याबद्दल ह्या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या संभाषणाविषयीही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोरोनाची लागण
देशात करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबई आणि परिसरासाठी एक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक अशा तज्ज्ञांच्या दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
११७ रुग्ण वाढल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८०० पार
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा आणखी वाढत चालला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे आणखी ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर पोहचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आज आढळलेल्या ११७ कोरोनाबाधितांपैकी ६६ रुग्ण मुंबईचे आहेत तर ४४ रुग्ण हे पुण्याचे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१७ सरकारी तर १५ खाजगी VDRL लॅब्स; देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात
देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचे २१ दिवस उलटून गेल्यानंतरही करोनाचा संसर्ग थांबेनासा झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
...आणि राज आहे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपत्तीत सर्व एकत्र असल्याचा संदेश दिला
राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पुन्हा जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
देशावर संकट असताना राजकारण करू नका; पवारांचा सबुरीचा सल्ला
कोरोनावर मात करताना सर्वांनी एकत्र राहुया, कोरोनावर मात करणं हे महत्त्वाचं असून राजकीय पक्षांनी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. मंगळवारी वांद्र्यात घडलेला प्रसंग दुर्देवी असल्याचंही पवार म्हणाले. कोणीतरी अफवा पसरवल्याने गर्दी झाली. वांद्र्यासारखा प्रकार पुन्हा घडू नये, संभ्रम वाढेल अशा सूचना करु नका असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात काही तासांतच ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू; पण इतर कारणही समोर
राज्यात सर्वात आधी करोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे. आधी रुग्णांची संख्या वाढत असताना काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, मागील आठवडाभरापासून करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा अडीच हजारांवर
राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत नाहीत. राज्यात रोज सरासरी शंभर करोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं आवाहन वाढलं आहे. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पण राज्यात महाविकास आघाडीची शिवभोजन योजना सुरु आहे....मग
राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात, स्वत:ला करून घेतलं होम क्वारन्टाइन
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात १२ तासांत ८२ नवे बाधित; रुग्णसंख्या दोन हजारांवर
महाराष्ट्रात आत्तापर्यंत आणखी ८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ८२ पैकी ५९ रुग्ण मुंबईतले आहेत. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी
महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून स्थगित केलेला इयत्ता दहावीचा बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बोर्डाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि अकरावीची परीक्षाही होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करतात? राष्ट्रवादीचं फेसबुक-ट्विटर हॅन्डल फॉलो करत जा
महाराष्टारीत करोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. उलट यात रोज भरच पडू लागली आहे. रविवारी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा