महत्वाच्या बातम्या
-
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १८९५वर; राज्य तीन विभागात विभागणार
राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ करोना रुग्ण आढळले असून त्यात आज दिवसभरात सापडलेल्या १३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच गेल्या २४ तासांत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२७वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण १००% बरे सुद्धा होतं आहेत; रुग्णांनी आत्महत्येचा विचारही करू नये
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे कोरोना झालेले अनेक रुग्ण १०० टक्के बरे होऊन घरी परतत असून देखील लोकांनी मनात भीती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
संसर्ग वाढतोय; महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
बेजवाबदार भाजप नेत्यांच्या मित्रांसोबत पार्ट्या; मग जवाबदारी ढकलतात मुख्यमंत्र्यांवर
देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण वाढत आहेत; धारावीप्रमाणे सरकारी यंत्रणेने कल्याण-डोंबिवलीत पाहणी करावी
राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,३८० वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले होते.
5 वर्षांपूर्वी -
वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल; १४ दिवसांसाठी खासगी रुग्णालयात क्वारंटाइन
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'माझे कौटुंबिक मित्र वाधवान'; आरोपाखालील व्यक्तींबाबत ठाकरे सरकारमधील सचिवाकडून उल्लेख
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीमंतांकडे समूह प्रवास परमिट आणि गरिबांनी अंतर राखा...सचिवामुळे सरकार गोत्यात
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज कोरोनाचे २५ बळी; रुग्णांचा आकडा १३०० पार
राज्यातील करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. आज दिवसभरात करोनाच्या संसर्गानं २५ जणांचा बळी गेला आहे. तर २२९ रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे. त्यामुळं करोनाबाधितांची एकूण संख्या १३४६ झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा आता शंभराच्या जवळपास पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय
आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही कपात होणार आहे.वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर, १६२ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकृत करूच नये अन केलं तर विकृती प्रमाणे मार सुद्धा खावा; रुपाली पाटील यांचं मनसे समर्थन
राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकांना लाभ नाही; भाजपच्या आरोपातील हवाच गेली
राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
महत्वाचा निर्णय; कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी ३ प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं
राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा १००० पार; एकूण संख्या १०१८वर
करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन उठवण्याबाबत तेव्हाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊ: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे सहभागी होते. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा. वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲड. अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यांतून या बैठकीत सहभागी झाले.
5 वर्षांपूर्वी -
काम करताना किंचाळण्याची गरज नसते; मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांना टोला
देशामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाशी लढा देण्यासाठी अनेक तातडीची पावले उचलताना तितकेच कठोर निर्णयही घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच नेतृत्वकौशल्याचे कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांच्या पुरवठ्यावरून ट्रम्प यांचा भारताला इशारा
अमेरिकेत कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी भारताकडून औषध पुरवण्याची अपेक्षा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘जर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केला नाही तर अमेरिका जशास तसे उत्तर देईल.’
5 वर्षांपूर्वी -
९ वाजता ९ प्रश्न; आपत्तीत खऱ्या गरजा समजणाऱ्या जागृत तरुणांचा प्रचार; राज्य सरकार सतर्क
जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूचा भारतातील विविध राज्यांमध्ये झापाट्याने प्रसार होत आहे. याचा परिणाम म्हणून पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट आणि टेस्टिंग किटची मागणी वाढत आहे. हे पाहता पुढील दोन महिन्यांत भारताला २.७ कोटी एन-९५ मास्क, १.५ कोटी पीपीई, १६ लाख टेस्टिंग किट आणि ५० हजार व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लढाई संपवायची आहे; लपून बसू नका, स्वत:हून पुढं या - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON