महत्वाच्या बातम्या
-
कर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेसारखी लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवार संतापले
‘लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल’, असा कडक इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; राज्यात एकूण १२४ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रभर पसरतोय कोरोना; रुग्णांची संख्या १२२ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर...तर १४ सदस्य डिस्चार्जच्या प्रक्रियेत
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर गेला आहे. बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईत आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुभ गुढीपाडवा; राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज
पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले हे पहिले रुग्ण आहेत. दुबई प्रवास करून आल्यानंतर त्यांना लक्षणं आढळली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी केंद्राचा निधी, लस, हॉस्पिटल, औषधावर बोला; टाळ्या-थाळ्या नको..प्लिज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. २४ मार्चला रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेल.’, तर, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
सर्व राज्यातील रुग्णांचा टेस्टिंग व औषधांचा खर्च केंद्राने उचलावा - मंत्री जितेंद्र आव्हाड
राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ तर साताऱ्यात १ नवा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने शतक पूर्ण केले आहे. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा पाहता महाराष्ट्रासमोरील चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - पुण्यातील कंपनीच्या कोविड-१९ स्वस्त चाचणी किटला केंद्रांची मंजुरी
कोरोना विषाणू शोध चाचणीसाठी पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या किटला केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मंजुरी दिली आहे. कंपनीनेच ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकार बाहेरील देशांमधून हे किट आयात करते. ते महागही आहे पण त्याच्या खर्चापेक्षा एक चतुर्थांश कमी खर्चात कंपनीचे किट उपलब्ध होणार आहे. याचा देशातील नागरिकांना फायदा होणार आहे. या किटच्या साह्याने केलेल्या चाचणीचे निकाल बिनचूक असणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनाचा चौथा बळी; मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं वय ६४ वर्ष
कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. ६४ व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. यूएईवरून मुंबईत ही व्यक्ती आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला. पण लोकं या निर्णयाचे तीन तेरा वाजवताना दिसत आहे. अद्याप नागरिकांना या कोरोनाची दाहकता लक्षात येत नाही, ही खंत सगळ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत देशभरात दहा जणांचा बळी गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर
भारतामध्ये एकीकडे ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९७ होती पण आता कोरोनाचे आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा १ असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०१ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सौदीहून परतलेल्या सांगलीतील ४ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णांचा आकडा वाढला
करोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढतो आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ४१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८९ वर पोहचली आहे. देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८९ रुग्ण आहेत. हाच धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात आजपासून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व इतर आवश्यक सेवा सुरुच राहणार
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात संचारबंदी लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
रोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी
कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली; पहा काय आहेत नव्या तारखा..
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले होते. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले होते, जेव्हा संकट येईल तेव्हा परप्रांतीय पळ काढतील; आज तेच चित्र?
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पुणे, मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या भितीमुळे परप्रांतीय गावाकडे निघाले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळाली. तर तीच परिस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर देखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संशयितांची नावं जाहीर करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा फैलाव वाढतच असून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मात्र, मनसेनं त्यास आक्षेप घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय नाही: मुख्यमंत्री
देशातल्या वाढत्या प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील सर्व निवडणुकांना अनिश्चित काळासाठी स्थगिती
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा