महत्वाच्या बातम्या
-
भाजपाचं फिल्मी प्रतिउत्तर? आमची छाती फाडली तरी रामच दिसेल: चंद्रकांतदादा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला.
5 वर्षांपूर्वी -
आमदार निधी थेट ३ कोटीवर; भाजप आमदारांची अर्थमंत्र्यांशी जवळीक वाढणार?
ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'मेकअप' बजेट आणि 'मेकओव्हर'वरून काय म्हणाले रोहित पवार?
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता, रोजगार देण्यासंदर्भात महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नियमती कर्ज भऱणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद महापालिका निवडणुकीपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही म्हणत सध्या सगळ तेच घेतात: चंद्रकांत पाटील
नरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नकाः चंद्रकांत पाटील
नरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत तब्बल २२ लाख शेतकर्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसरी यादी २२ लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सोमवारी यासंदर्भात अधिवेशनात माहिती देण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे संभाजीनगरमध्ये करणार 'भगवं शक्तिप्रदर्शन'; स्वतः राज ठाकरे सहभागी होणार?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली होती. तसेच तिथीनूसार देखील शिवसेना शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. मात्र मनसे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी १२ मार्चला तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. तसेच राज ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही; संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे: चंद्रकांत पाटील
आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असे नामकरण झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला हात घातला. औरंगाबाद शहराचे नवा संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी; कोणाचा पत्ता कट?
राज्यसभेवर रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आधीच निश्चित आहे. आता त्यांच्यासोबत असलेले माजीद मेमन यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री फौजिया खान यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार
मुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा : मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पोस्टर लावण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कात टाकत हिंदुत्त्वाचा नारा दिला. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
९ फेब्रुवारीला जातीचा दाखल हरवला; वकील १५ फेब्रुवारीला सांगतात दाखला उच्च न्यायालयात?
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी याचे जात प्रमाणपत्र सोलापूरातील जात पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. खासदारकी वाचवण्यसाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला हरवला आहे. याप्रकरणी त्यांनी वळसंग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज मराठी भाषा दिन; गर्व आहे मराठी असल्याचा
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या दिवसाचं औचित्य साधत राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी त्या ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर फडणवीसांचे काय होईल? - शिवसेना
भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? असा टोला शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यभरातील १,५७० ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान
राज्यभरातील १९ जिल्ह्यांमधील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वंचितला मोठा धक्का! माजी आमदारांसह तब्बल ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर, वंचितचे महाराष्ट्र राज्य सचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC : उद्धव ठाकरेंचे दोन्ही दगडांवर पाय - आनंदराज आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. यावरूनच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री हे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC