महत्वाच्या बातम्या
-
विठ्ठल माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही: शरद पवार
‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेला हाणला.
5 वर्षांपूर्वी -
कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे: अब्दुल सत्तार
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसे 'हिंदुत्वा'मुळे शिवसेनेला खिंडार; सुहास दाशरथेंचा मनसेत प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने गेल्याने शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. मनसे आता हिंदुत्वाचा अजेन्डा हाती घेणार असल्याने शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबादचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांच्या सहित त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महामोर्चा पूर्वी मनसेकडून जोरदार तयारी; उद्या देशभर मनसेच्या भगव्याची चर्चा रंगणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यात आज ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्यात येणार होती मात्र ऐनवेळी पुणे पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी मनसेचे पदाधिकारी बाईक रॅलीवर ठाम आहेत. पोलिसांनी परवानगी न दिल्यास विनापरवानगी बाईक रॅली काढण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मनसे आणि पुणे पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉजवरील पोलिस धाडीत तब्बल १३ कॉलेज जोडपी ताब्यात; पालक धास्तावले
चंद्रपुर इथे नागपूर महामार्गावरील जनता चौक इथल्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा रेणुका गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकूण १३ महाविद्यालयीन जोडपी आढळून आली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गेस्ट हाऊस मालक आणि त्याचा साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन लोटस 'एक दंतकथा'; राज्य भाजप फुटणार असल्याने आधीच पेरणी? सविस्तर
राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता ३ महिने होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे आलंय. दरम्यान, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी CAA कायद्याचं समर्थन केल्याने काँग्रेस नाराज असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापतीची धारदार शस्त्राने हत्या
सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या खुनाचं सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येचा उलगडा होत नाहीत तोच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग इथं अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 'भगवी' झुंज देणार; ५८ जागा लढणार
एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. पक्षाने सर्व ११५ वॉर्डातून उमेदवार देण्याची तयारी दर्शवली असली तरी आजच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ५८ वार्डातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. या वार्डातून इच्छूक असललेल्यांची यादी देखील तयार करण्यात आली असून लवकरच ती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यामुळे या पक्षातील नाराजांना प्रवेश देऊन येणाऱ्या महापालिकेत चांगली कामगिरी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे: चंद्रकांत पाटील
‘सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजेच ‘सीएए’मुळे कुणाचं नुकसान होत नाही, या मताशी आपण सहमत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं. ‘हे साप म्हणून भुई बडवण्यासारखे आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते आमच्याशी सहमत झाले असतील, तर त्यांनी राज्यात कायदा अस्तित्वात आणावा. त्याविरोधात सुरु असणारी आंदोलनं थांबवणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ‘सामना’मध्ये तसं जाहीर छापून आलं आहे, त्यांनी ‘मला तसं म्हणायचं नव्हतं’ म्हटलं नाही म्हणजे झालं, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.
5 वर्षांपूर्वी -
जे माझ्या वडिलांनी शिकवलेलं ते हे हिंदुत्व नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकृतांमुळे लेकीचं जगणं असह्य! सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेला पेटवलं
महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
माणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे
नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
5 वर्षांपूर्वी -
वर्धा: त्या आरोपीला सुद्धा जाळून टाका, न्याय द्या; स्थानिकांची घोषणाबाजी
नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
5 वर्षांपूर्वी -
'बुलेट ट्रेन' प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती; उपयोग कोणाला होणार? मुख्यमंत्री प्रकल्पावर नाखूष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाला पांढरा हत्ती म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पावर सगळ्यांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे, असे सांगताना बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, या प्रकल्पामुळे किती उद्योगधंद्याना चालना मिळणार आहे, हे पाहणे महत्वाचे असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडून गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी; शिक्षेची तरतूद
महाराष्ट्रात ३५० हून अधिक गडकिल्ले हे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या गडकिल्ल्यांना निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. या गडकिल्ल्यांवर अनेक तरुण तरुणी जात असतात. पण त्यापैकी काही इतिहास समजून न घेता केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी गडकिल्ल्यांवर जातात. त्या ठिकाणी जाऊन दारुच्या पार्ट्या करत हुल्लडबाजी करतात. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने अनिल देशमुख यांनी गडकिल्ल्यांवर दारु पिणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याच म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साप करायला वेळ लागणार नाही
माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रात 'असे' सरकार येणार हे LIC'ला माहित असतं तर त्यांनी स्वतःचीच पॉलिसी काढली असती: आ. रोहित पवार
एलआयसीला माहिती असतं केंद्रात “असे’ सरकार येणार आहे, तर त्यांनी सर्वात प्रथम स्वत:चीच पॉलिसी काढली असती. इतकी वाईट स्थिती देशात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणली आहे. सर्वच क्षेत्राचे खासगीकरण केले जात आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी नोंदवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC: मनसेच्या भगव्याची उघडपणे बॅनरबाजी; तर काँग्रेस-एनसीपी'मुळे शिवसेना संभ्रमात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी करताना हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरून सध्या मुंबई पुण्यात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात उघडपणे बॅनरबाजी होताना दिसत आहे. मनसेच्या भगव्याने कट्टर भूमिका घेतली असली तरी युतीच्या काळात उघड भूमिका मांडणारी शिवसेना महाविकास आघाडीमुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा अभूतपूर्व असेल अशी माध्यमांमध्ये देखील चर्चा असून, त्यानंतर राज ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका देशभर बळकट होऊन मनसेबद्दल भविष्यातील वेगळी विचारधारणा निर्माण होण्याची अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा