महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रनामा न्यूज इफेक्ट - पोलिसांचा पगार AXIS मधून SBI मध्ये वर्ग होणार? सविस्तर वृत्त
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल. महाराष्ट्रनामा न्यूज’ने सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने त्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या असून पोलिसांचे आणि सरकारी योजनांचे पैसे यापुढे AXIS बॅंके एवजी सरकारी बँकेत म्हणजे SBI मध्ये वर्ग होण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी मुख्यमंत्री अन त्यांच्या पत्नींचा साधेपणा; आज पद जाताच का होतोय आकांडतांडव?
महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री राज्याच्या सर्वोच्च पदावर पुन्हा-पुन्हा विराजमान झाले होते आणि त्यामागे त्यांची मोठी राजकीय मेहनत देखील तितकीच महत्वाची होती. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख असो की युतीच्या काळातील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द आजही तितकीच अबाधित आहे.
5 वर्षांपूर्वी -
'हम तो वो शक़्स हैं की, धुप में भी निखर आएँगे': अमृता फडणवीसांचा सेनेला टोला
त्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर
‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे-पवार सरकारकडून शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॅग'च्या रिपोर्टप्रमाणे फडणवीसांच्या काळात ६५ हजार कोटींचे घोटाळे - जयंत पाटील
तत्कालीन फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ नसल्याचा संशय कॅगने अहवालात व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात बेसुमार पैसेवाटप झाल्याचं म्हटलं आहे. दिलेल्या कामांमध्ये नगरविकास खात्याची कामं जास्त होती. त्यासाठी पाहिजे तसं पैशांचं वाटप करण्यात आल्याचं पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
CAA आंदोलनं: देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य बाळासाहेबांचा नातू, पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही: अजित पवार
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नागपुरात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अनेक नवखे आमदार विधिमंडळात आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरेही पहिल्यांदाच आमदार झाला आहे. आता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आदित्य हा बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट; एसीबीचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र
जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. एसीबीकडून सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची चौकशी केली जात असून, त्यापैकी ४५ प्रकल्प हे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २-३ महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. शेतकरी कर्जमाफीबाबत एनसीपी’चे नेते आमदार अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया २ ते ३ महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा - राज्यपाल
देशभरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना समोर येत आहे. हैदराबादमधील पशुवैद्यक महिलेवरील बलात्काराने देश हादरला होता. तसेच हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याप्रकरणाची घटना ताजी असतानाच, ओडिशातही पुरी येथे एका पोलीस हवालदारासह दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. नागपुरात देखील एका ५ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करुन अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यातच बलात्कारच्या घटना थांबवायचे असल्यास लहान मुलांनी संस्कृत श्लोक शिकायला हवे, असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यापालांच्या या बेजबाबदार विधानावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे
शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: सत्ता जाताच भाजप आमदारांचा टोलनाका बंद वरून मनसे खळखट्याक मार्ग
खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदर्श सध्या सत्ता जाताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी देखील घेतल्याचं दिसत आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात कोणीही कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये उपदेश देणारे भाजप सरकार सत्ता जाताच खळखट्याक मार्गावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आंदोलन साताऱ्यात घडलं आहे आणि मनसे स्टाईल’मुळे चर्चेत सुद्धा आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी मुख्यमंत्री फडणवीस खोटे व्हिडीओ शेअर करत आहेत - पृथ्वीराज चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मुखपत्र चक्क हिंदी-गुजरातीत? सविस्तर वृत्त
महाराष्ट्र शासन सरकारी कामकाजात १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या चक्क हिंदी, गुजराथी आणि उर्दू आवृत्तींच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी सचिव तथा महासंचालक सुरेश वांदिले देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे व सेनेच्या बदनामीसाठी खोटा व्हिडिओ प्रचार; फडणवीस सुद्धा सामील - सविस्तर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संसदेत मजूर झाल्यानंतर देशभर मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे. विद्यार्थीच रस्त्यावर ईशान्य भारतात उग्र स्वरूप आलेलं असताना दिल्लीत विद्यापीठात देखील प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (एएमयू) विद्यार्थ्यांच्या संबंधित आंदोलन आणि घोषबाजीवरून १-२ व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर अधिवेशन: शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
अजब! सावरकरांवर सडकून टीका करणारे भाजप आ. नितेश राणे आणि फडणवीस सभागृहात एकत्र?
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा