महत्वाच्या बातम्या
-
सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे सेनेला ठरवायचे आहे: देवेंद्र फडणवीस
कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किची लाचारी ठेवायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाहीस अशा शब्दात काँग्रेसच माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेतल्याची टीका करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जारदार टीकास्त्र सोडलं.
5 वर्षांपूर्वी -
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार-खासदारांकडून पंकजा मुंडेंना इशारा वजा तंबी
१२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर खडसे आणि पंकजा मुंडे यांची खदखद समोर आली आहे. परंतु या जाहीर मेळाव्यानंतर सोलापूर येथील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे तंबी वजा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खातेवाटप....ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
'पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल' - आ. धनंजय मुंडे
मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. २७ जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
निश्चय झाला! पंकजा मुंडे मशाल घेऊन महाराष्ट्रभर संकल्प दौरा करणार
मी एक मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असून, सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवू नका, असंही त्यांनी सांगितलं आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा आणि चांगला सधन शेतकरी तयार करण्यासाठी योगदान द्या, असं आवाहनच त्यांनी केलं आहे. २७ जानेवारीला औरंगाबादला मी लाक्षणिक उपोषण करणार असून, मराठवाड्याच्या पाण्याच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधणार असल्याचंही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवलं आहे. पाच वर्षांत जे केलं त्याला पुढे नेण्यासाठी या सरकारचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला कोअर कमिटीतून मुक्त करा: पंकजा मुंडे
‘माझ्यावर पदासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भारतीय जनता पक्ष कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोपीनाथजींनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: एकनाथ खडसे
गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्ष नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गोपीनाथ गडावर दिवंगत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे यांचं फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र
२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सर्व प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेस अपयश आल्यानंतर नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे'... आ. धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
गोपीनाथ मुंडेंची गुरुवारी जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच जोरदार शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डावपेचांची आखणी करणार हे नक्की.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेंचा पक्ष ठरला, उद्याच जाहीर प्रवेशानंतर भाजपामध्ये भूकंप होणार? सविस्तर वृत्त
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊन मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये मोठी फूट पडणार; राजकीय भूकंप करत नरेंद्र-देवेंद्र या एकाधिकारशाही विरुद्ध बंड?
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ४० मिनिटे विधानभवनात भेट घेतल्याने खडसे नक्की काय करणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, उद्या, १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासह आपणही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमाला विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहता हेदेखील उपस्थित राहणार आहेत. खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असून भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देताना फडणवीसांना लांब ठेवण्यात आलं आहे. तसेच पक्षातील तिकीट नाकारण्यात आलेले सर्व नेते उद्या गोपीनाथ गडावर हजर राहणार असल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री असूनही फडणवीसांनी ५ वर्षांत स्व. गोपीनाथ मुंडें'चं स्मारक उभारलं नाही
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच
भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊ पक्षात आले तर आम्हाला आनंदच : बाळासाहेब थोरात
नाथाभाऊ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलेले नाही. अशी माणसे पक्षात आली तर आम्हाला आनंदच होईल. पक्षाला त्यामुळे बळकटी मिळेल,” असे मत राज्याचे मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या धक्क्यातून भाजप नेते सावरले नाहीत? म्हणाले सरकार मे-जून'मध्ये कोसळणार
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला. इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही गिरीश व्यास म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मी कांदा खात नाही, तुम्ही सुद्धा खाऊ नका' हे त्यांचे अर्थव्यवस्थेबद्दलचे ज्ञान: शिवसेना
महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात रोज राजकीय खटके उडताना दिसत आहेत. त्यात कालच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं, परंतु त्यावेळी भारतीय जनता पक्षाने ज्या ५ राज्यात जनमत धुडकावलं ते सामान्य लोकसांपासून दडवलं आणि त्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होताच पुन्हा चिडीचूप झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सामना मुखपत्रात शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेवरून भाजपाला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलीकडे आठवलेंनी काहीच केलं नाही: आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या टीकेला तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. आंबेडकरी जनतेच्या संदर्भातील सर्वच विषयांवर रामदास आठवले भारतीय जनता पक्षाला पोषक ठरणाऱ्या प्रतिक्रिया नेहमीच देत असताना. मात्र इंदू मिल संदर्भातील त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा