महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री असूनही फडणवीसांनी ५ वर्षांत स्व. गोपीनाथ मुंडें'चं स्मारक उभारलं नाही
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच
भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊ पक्षात आले तर आम्हाला आनंदच : बाळासाहेब थोरात
नाथाभाऊ खडसे हे आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलेले नाही. अशी माणसे पक्षात आली तर आम्हाला आनंदच होईल. पक्षाला त्यामुळे बळकटी मिळेल,” असे मत राज्याचे मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या धक्क्यातून भाजप नेते सावरले नाहीत? म्हणाले सरकार मे-जून'मध्ये कोसळणार
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला. इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही गिरीश व्यास म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मी कांदा खात नाही, तुम्ही सुद्धा खाऊ नका' हे त्यांचे अर्थव्यवस्थेबद्दलचे ज्ञान: शिवसेना
महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात रोज राजकीय खटके उडताना दिसत आहेत. त्यात कालच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं, परंतु त्यावेळी भारतीय जनता पक्षाने ज्या ५ राज्यात जनमत धुडकावलं ते सामान्य लोकसांपासून दडवलं आणि त्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होताच पुन्हा चिडीचूप झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सामना मुखपत्रात शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेवरून भाजपाला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलीकडे आठवलेंनी काहीच केलं नाही: आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या टीकेला तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. आंबेडकरी जनतेच्या संदर्भातील सर्वच विषयांवर रामदास आठवले भारतीय जनता पक्षाला पोषक ठरणाऱ्या प्रतिक्रिया नेहमीच देत असताना. मात्र इंदू मिल संदर्भातील त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
परळीत फक्त धनंजय मुंडे! महाविकास आघाडीच्या परळीत पहिल्या सरपंच
परळी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे अजून स्थानिक पातळीवरील राजकीय धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. मात्र, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे येथील स्थानिक सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व डेटा असुरक्षित असताना सुद्धा ऍक्सिस'मध्ये खाती का? गृहखातं चौकशी करणार?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष होईल; भाजपात गेलेले आमच्या संपर्कात: जयंत पाटील
भारतीय जनता पक्षात अनेक गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करुन आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा एनसीपी’चे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. २०२४ मध्ये एनसीपी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करु असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सांगलीमधील इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे, लवकर बऱ्या व्हा; प्रियांका चतुर्वेदींचा अमृता फडणवीस यांना टोला
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर थेट 'फक्त कमिशनसाठी' असा शब्दप्रयोग करत टीका
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'ना सर्वाधिक संधी दिल्याचं सांगत पंकजा मुंडेंच्या मागण्या अमान्य करण्याची रणनीती
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी मोठा राजकीय निर्णय घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर यावर भारतीय जनता पक्षातील केंद्रापासून ते राज्यातील नेते मंडळी हिदुत्वापेक्षा थेट ओबीसी’च्या मुद्यावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचारात राज्य दुसऱ्या स्थानी असूनही फडणवीसांनी निर्भया निधी वापरलाच नाही
देशभरात सध्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांनी मोठ्याप्रमाणावर तोंड वर काढलं आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासहित गृहमंत्री पद देखील सांभाळणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती असंवेदनशील होते याचा अजून एक पुरावा याच गंभीर विषयावरून समोर आला आहे. कारण, देशभरात महाराष्ट्र राज्य महिला विषयक गुन्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं होतं. तसाही राज्याला गृहमंत्री आहे हे सामान्य माणसाला कधी माहीतच नव्हतं, कारण सर्वाधिक गुन्हेगारच भाजपमध्ये असल्याचं समोर आल्यानंतर सामान्यांनी गुन्हेगारांवर कारवाईची अपेक्षा सोडून ‘क्लीन-चिट’ची सवय लावून घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी
भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप तोंडघशी! अजित पवारांना निर्दोषत्व; न्यायालयातील प्रतिज्ञापत्र फडणवीसांच्या काळातील
महाविकास आघाडी सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे असं म्हटलं गेलं. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जबाबदारी ठरविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अॅन्ड इन्स्ट्रक्शनचा आधार घेतला आहे. (Former Deputy Chief Minister Ajit Pawar gets Clean Chit from ACB in Irrigation Scam)
5 वर्षांपूर्वी -
१९८० मध्ये पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं: भाजप खा. संजय काकडे
महाराष्ट्रात शिवसेनेनं काँग्रेस-एनसीपी’सोबत जात ऐतिहासिक आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. परंतु, ही आघाडी टिकणार नाही, सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने रोहिणी खडसे पराभूत झाल्या: गिरीश महाजन
जळगावात येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रतिउउतर दिलं आहे. महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वी १२०० आणि त्यानंतर ८५०० हजार मतांनी निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने खडसे यांना तिकीट नाकारल्याने अधिक फरक पडला नाही.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला? पवारांच्या त्या टीकेमुळे १० रुपयात थाळी बोंबलणार?
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या १० रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावेळी एका सभेतील प्रचारात तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. विधानसभा निवडणुकीच्या बार्शी येथील प्रचारसभेत पवारांनी शिवसेनेच्या त्या घोषणेवर टीका केलो होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL