महत्वाच्या बातम्या
-
पंढरपूरला जाणाऱ्या गाडीला अपघात; ५ वारकऱ्यांचा मृत्यू
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला असून यात ५ जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला व पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते.
5 वर्षांपूर्वी -
कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे मंडईतील भाजी आहे काय? सेना आ. गुलाबराव पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बैठकीनंतर आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदावर पाठवण्यात आलं आहे. सर्व आमदार दोन दिवस हॉटेल रंगशारदामध्ये राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सगळं आधी ठरल्याप्रमाणे व्हावं, बाकी मला काही अपेक्षा नाही: उद्धव ठाकरे
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री असतो: नितीन गडकरी
शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशिवाय अल्पमतातील सरकार स्थापन करू नका; भाजपाला दिल्लीतून सूचना
शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्यापेक्षा विरोधी पक्षात बसा; आरएसएस'चा सल्ला?
राज्यातील सत्तापेच कठीण बनला असताना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली असताना, आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचे आमदार फुटू नये म्हणून प्रत्येक आमदारावर विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखाची नजर
विधानसभा निवडणुकीनंतर आक्रमक झालेली शिवसेना अजूनही शांत झालेली नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असं शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या १४४ जागांपासून भारतीय जनता पक्ष मागील निवडणुकीच्या तुलनेत जास्तच दूर राहिल्याने शिवसेनेनं संधी साधली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला त्यांचे आमदार फुटण्याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता स्थापनेबाबत भाजप-शिवसेने दरम्यान आज मोठ्या घडामोडी
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरी, बुधवारचा दिवस दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चर्चेच्या टेबलावर आणणारा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाबाबतच्या उपाययोजनांसाठी बोलावलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेनेचे सहा मंत्री उपस्थित होते. यातील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे आज, गुरुवारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून, यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार तर सेनेच्या आमदारांची तातडीची बैठक
राज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही? याचा सस्पेन्स वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत
मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचे प्रश्न अन अजब पाठपुरावा; एक भेटले केंद्रीय गृहमंत्र्यांना तर दुसरे दळणवळन मंत्र्यांना
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय कृषीमंत्री अमित शहा शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता: मिटकरींकडून खिल्ली
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा-शिवसेनेनेच सरकार स्थापन करावं: शरद पवार
भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री सेनेचाच हवा ही शेतकऱ्यांची सुद्धा मागणी : संजय राऊत
मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे गेले होते. तसंच आदित्य ठाकरेही अनेक भागांमध्ये गेले होते. शेतकरी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. काहीही झालं तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आता नव्याने काय सांगायचं? कुठलाही नवा प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचं म्हणणं आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना लवकरच मुख्यमंत्री पदावरून पलटी मारण्याची शक्यता: सविस्तर
शिवसेना मुख्यमंत्री पद घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हणणारे लवकरच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण सर्व खटाटोप हा केवळ इतर महत्वाची मलईदार मंत्रिपदं पदरात पाडून घेण्याच्या चर्चा पडद्याआड सुरु होत्या आणि लवकरच त्या पूर्णत्वाला येताच शिवसेना पलटी मारण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाकडेच संपूर्ण कार्यकाळ म्हणजे ५ वर्षे मुख्यमंत्रिपद आणि त्यामोबदल्यात शिवसेनेला मलईदार महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी मंत्रिपदे, असा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला जवळपास पडद्याआड निश्चित झाला असून याची घोषणा पुढील १-२ दिवसांत होईल, अशी माहिती प्रसार माध्यमांच्या हाती आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार: चंद्रकांत पाटील
राज्यात जनतेने भारतीय जनता पक्ष -शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असं सांगतानाच सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही...आणि केल्यास
आमचा कोणताही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर #RejectFadnavisForCM हॅशटॅग ट्रेण्डमध्ये
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असतानाही सत्ता स्थानपनेची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने आता भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. तर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ट्विटरवरही नेटिझन्स मुख्यमंत्रिपदाबाबत आपापली मतं व्यक्त करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे वृत्त; राजकीय गोंधळ कायम
शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.BJP
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON