महत्वाच्या बातम्या
-
लवकरच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूनं झुकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही विरोधीपक्षाची भूमिका बजावणार: जयंत पाटील
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच एनसीपीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जनतेनं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाचीच भूमिका बजावणार असल्याचं” मत त्यांनी व्यक्त केलं. आज (बुधवार) एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार नवाब मलिक यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री; शुक्रवारपर्यंत पदाची शपथ घेणार?
भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.
5 वर्षांपूर्वी -
समोर पैलवानंच नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना पावसात भिजणारे पवार पुन्हा आठवले
विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काय गाजलं असेल तर ते साताऱ्यातलं शरद पवारांचं पावसातलं भाषण. शरद पवारांच्या या पावसात भिजण्यावर आता मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका केली आहे. निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुबंईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या वादावरही मोठं वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरबाबत ‘तसं’ मी झोपेतही बोलू शकत नाही : चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युतीच्या झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषद रविवारी घेतली होती. यावेळी एका वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना समाज माध्यमांवर ट्रोल केलं गेलं. कोल्हापूरबद्दल केलेल्या त्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू होती. आता त्यावर चंद्रकांत दादांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉटसअपवर आलेले मेसेज वाचून दाखवले. जो मेसेज वाचून दाखवला त्यामध्ये शेवटचं वाक्यही होतं. त्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा अपमान होईल असं वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नााही असं त्यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता उद्धव यांच्या हाती: शिवसेनेचा इशारा
महाराष्ट्रातील सत्तेचे रिमोट कंट्रोल आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे शिवसेनेने रविवारी सांगितले. २०१४च्या तुलनेत यावेळी विधानसभेत कमी जागा मिळून देखील शिवसेनेने हा दावा केला आहे. १९९५ ते १९९९ या सत्ता काळात शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे हे सहसा ‘रिमोट कंट्रोल’ हा शब्द वापरत असत.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंसाठी सेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे: रामदास आठवले
शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनीही म्हटले आहे. शिवसेनेने समसमान फॉर्म्युला समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला मान्य होईल असे वाटत नाही त्यापेक्षा शिवसेनेने पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाने अशी ऑफर दिली तर शिवसेना ही ऑफर स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली.
5 वर्षांपूर्वी -
सातारा दौरा रद्द करण्यावर शरद पवारांचा खुलासा
उदयनराजे भोसले यांनी एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सातारमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने एनसीपी’साठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार: प्रफुल्ल पटेल
राज्यात एनसीपी विरोधी पक्षात बसणार आहे. तसंच एनसीपी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असं स्पष्टीकरण एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये झालेल्या पराभवावर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट
विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल समोर आले. परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत राज्याचं लक्ष वेधून घेतलं. परळीतील या धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार
भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईलआणि उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
वाघाच्या गळ्यात घड्याळ अन कमळाचा सुगंध; राऊतांना नक्की काय सूचित करायचंय?
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला स्वबळ तर दूरच, पण २०१४च्या निवडणुकीत होत्या, तेवढ्या जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेना अधिक कठोर आणि अडून राहणं हे साहजिक आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करणं अशक्यच असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाव आता युतीमध्ये चांगलाच वधारला असून या लहान भावाचा हट्ट आता भारतीय जनता पक्षाला पुरवावाच लागेल अशी चिन्ह आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने आधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या दिलेल्या असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करून समाज माध्यमांवर नवी चर्चा सुरू करून दिली आहे. हे व्यंगचित्र रवि नावाच्या व्यंगचित्रकाराने काढलं असून त्याचं देखील कौतुक संजय राऊत या ट्वीटमध्ये करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनसीपी सेनेला पाठिंबा देऊ शकतात: पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार मतदाराने भाजप-शिवसेना युतीला कारभारासाठी आणखी ५ वर्षे दिली आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची एकत्र येण्याची शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे भाजप-शिवसेना युतीला एकूण १६१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५४ तर कॉंग्रेसने ४३ जागा जिंकल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जिंकलो नाही पण संपलो ही नाही: उदयनराजे भोसले
विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारसभा झाल्या. पायाला जखमा असतानाही वयाच्या ८०व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे आणि उदयनराजेंना पराभव पाहावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपवर शिवसेनेच्या दबावाखाली काम करण्याची वेळ: सविस्तर
२०१४ च्या विधानसभेत स्वबळावर लढून आलेल्या १२२ जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार शिवसेनेला सोबत घेऊन पाच वर्षे तारून नेले. मात्र या विधानसभा निवडणुकीत १००च्या आसपास जागा आल्यामुळे ते विधानसभेतील बहुमतांच्या १४५ या आकड्यापासून बरेच दूर राहिल्यामुळे शिवसेनेच्या अटी व शर्तीवर त्यांच्यावर सरकार चालविण्याचे वेळ आली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या दबावाला तोंड देत सरकार चालविणे हाच मुख्य अजेंडा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेत प्रवेश करणाऱ्या तब्बल १९ आयात उमेदवारांचा पराभव
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीची हवा असल्याचा अंदाज बांधून महायुतीत गेलेल्या १९ आयारामांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षांतर करणाऱ्या आयारामांना मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीत आलेले १६ आयाराम जिंकले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मला सत्तेची हाव नाही; पण सत्तेत समसमान वाटा हवा: उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा इशारा देतानाच जागा वाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला दिला.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले: शरद पवार
भाजपाची अब की बार २२० पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा