महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला; निंबाळकर सुखरुप
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे भर प्रचार सभेत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ओमराजे निंबाळकर प्रचार करत असताना एका युवकाने त्यांच्याशी येऊन हात मिळवला आणि नंतर दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र निंबाळकर यांनी आपल्या हाताने हा हल्ला अडवला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली असून हल्ला करणारा तरूण फरार झाला आहे. दरम्यान जखमी निंबाळकर यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
टीकेची पातळी घसरली; हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर अश्लिल भाषेत टीका
शिवसेनेचे माजी आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
PMC बँक: नोटबंदीप्रमाणेच लोकांचे जीव जात आहेत; पण मोदी सभेत भाष्य करणार का?
घोटाळ्याच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा आघात झाला असून आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय गलितगात्र झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
यशस्वी लोकशाहीसाठी विरोध पक्ष अत्यंत महत्त्वाचा आणि राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत: गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे एक सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करायला हवा: नितीन गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते तर खुद्द मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेत मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे, ते पुण्यातल्या कसब्यातील सभेत बोलत होते. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पक्ष प्रचार गीत देखील प्रसिद्ध करत आहेत. त्यात भाजप सर्वात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यातील मतदाराला भावनिक साद घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतीची घौडदौड दाखवण्यासाठी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा विजय असो अशा आशयाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. त्यानंतर एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये शिवसेनेच्या मागील वर्षीच्या जाहीरनाम्याची आणि घोषणांची आठवण मतदाराला करून देत आहेत. तत्पूर्वी मनसेने केलेल्या अनेक आंदोलनांचे दाखले आणि त्यातून निष्पन्नं झालेले सकारात्मक परिणाम देखील ते सभांमधून मांडताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाषणात बेरोजगारीवर भाष्य नाही आणि जाहीरनाम्यात नव्या एक कोटी रोजगारांचा मुद्दा
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
त्याच विषयावर दोन निवडणुका; २०१४ नंतर पुन्हा २०१९ मध्ये शिव स्मारकाचा समावेश
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी भाजपाचं ‘संकल्पपत्र’ प्रकाशित
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता जाण्याच्या भीतीनेच मोदींच्या ९, शहांच्या २०, फडणवीसांच्या ५० सभा: शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत प्रश्न उपस्थित केला की, विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांशी कोणताही सामना नाही हे भाजपला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर सभा का आयोजित करत आहात?. चाळीसगाव येथे सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ताधारी भाजप भाजप झोपेत आहे आणि त्यामुळेच ते गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पवारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री तेल लावल्यावर कसे दिसता जरा कळू द्या; तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा: जयंत पाटील
तेल लावलेला पैलवान विषयावरून राष्ट्र्वादीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक कमजोर दिसत असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असं वाटू लागल्याने ते सभांमध्ये वारंवार त्याचा उल्लेख करत आहेत. युतीशी सामना करण्यासाठी तुल्यबळ विरोधकच शिल्लक न राहिल्याने निवडणूक एकतर्फी होणार आणि आमच्या विरुद्ध तूल्यबळ विरोधक म्हणजे पैलवानंच नसल्याचं मुख्यमंत्री टोला लगावत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात युतीचे सरकार येण्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभार जबाबदार: राज ठाकरे
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी रोज सभा घेत ते सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीमध्ये झालेल्या प्रचार सभेत सरकारसह विरोधकांवरही टीका केली. पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागातील प्रतिसादामुळे आघाडीच्या १७५ जागा निवडून येतील: अजित पवार
राज्यभरात आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या सभांदरम्यान नागरिक भाजपा आणि शिवसेनेच्या कारभाराबद्दल जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडीला १७५ जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचाररॅली दरम्यान ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
#मोदी_परत_जा ट्रेंडिंग धुमाकूळ; एका दिवसात लाखाहून अधिक ट्विट
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रविवारी जळगावमध्ये पार पडली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. मात्र मोदींच्या या पहिल्याच सभेला अनेकांनी विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता.
5 वर्षांपूर्वी -
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार: पृथ्वीराज चव्हाण
विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेची भिंत तोडली; सहामाही परीक्षा पुढे ढकलली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रांगणात सभेची परवानगी देताना इमारतीची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सभेमुळे शाळेतल्या परीक्षेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही: शरद पवार
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. या सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत: राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय ‘हीच ती वेळ’, यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग ५ वर्षे वेळ नव्हता का? गेली ५ वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा